महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Preity Zinta : ४६ व्या वर्षी प्रीति झिंटाने दिला जुळ्यांना जन्म, लग्नाच्या ५ वर्षांनी दिली Goodenough न्यूज - Bollywood

बॉलीवुड अभिनेत्री प्रीति झिंटा (Bollywood Actress Preity Zinta) आणि पती जीन गुडइनफ (Gene Goodenough) यांंनी सोशल मीडियावर एक गुड न्यूज शेअर केली आहे. या कपलने सरोगेसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. तिने स्वतः ट्वीटर वर ही गोड बातमी शेअर केली आहे.

Bollywood Actress Preity Zinta)
बॉलीवुड अभिनेत्री प्रीति झिंटा

By

Published : Nov 18, 2021, 12:42 PM IST

Updated : Nov 18, 2021, 3:58 PM IST

नई दिल्ली -बॉलीवुड अभिनेत्री प्रीति झिंटा (Bollywood Actress Preity Zinta) आणि पती जीन गुडइनफ (Gene Goodenough) यांंनी सोशल मीडियावर एक गुड न्यूज शेअर केली आहे. या कपलने सरोगेसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. तिने स्वतः ट्वीटरवर (@realpreityzinta) ही गोड बातमी शेअर केली आहे.

'हे' ठेवले प्रीतिने आपल्या बाळाची नावे -

या ट्वीटमध्ये प्रीतिने आपल्या पती सोबत एक सुंदर फोटो शेअर केला आहे. त्याखाली तिने लिहिले आहे की, 'सगळ्यांना माझा नमस्कार, मी आज तुमच्या सर्वांसोबत एक मोठी बातमी शेअर करू इच्छित आहे. जीन आणि मी खूप खूश आहोत. आणि आमचे मन हे कृतज्ञता आणि प्रेमाने भरले आहे. आम्ही आमच्या परिवारात आमच्या जुळ्या जय जिंटा गुडइनफ आणि जिया जिंटा गुडएनफ या मुलांचे स्वागत करत आहोत.

एक मुलगा आणि एक मुलगी -

प्रीति झिंटाने लिहिलेल्या पोस्ट वरून तिच्या मनातील आनंद आपल्या स्पष्ट दिसून येत आहे. तिने आपल्या मुलांचे नाव हे जय आणि जिया असे ठेवले आहेत. ज्यातून हे दिसून येते की, जय हा मुलगा आणि जिया ही मुलगी आहे. परंतु, प्रीतिने मुला-मुलींबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही.

पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव -

प्रीति झिंटाच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवुड इंडस्ट्रीसह तिचे चाहते हे शुभेच्छा देत आहेत.

अन्य कलाकारही सरोगेसीच्या माध्यमातून आईवडील -

एकाता कपूर, तुषार कपूर, करण जौहर, शिल्पा शेट्टी यांच्यासारखे अन्य कलाकारही सरोगेसीच्या माध्यमातून आईवडील झाले आहेत.

पतीच्या गालाचे चुंबन

महामारी हा शब्द केवळ इतिहासाच्या पानांमध्ये दिसला, अशी जुनी आठवण अभिनेत्री प्रिती झिंटाने सांगितली होती. प्रितीने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ती आपल्या पतीच्या गालाचे चुंबन घेताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय होतं, ''महामारी इतिहासातील पुस्तकांमध्ये होती, तेव्हाचे बिनधास्त दिवस आठवतात. आपले आयुष्य सुरक्षित आणि आरोग्यदायी अगदी पक्ष्यांसारखे मुक्त होते, ते दिवस परत आणा.''

प्रितीने २० वेळा केलीय कोरोना टेस्ट

या अभिनेत्रीने अलीकडेच एक पोस्ट लिहून सांगितले होते की, ती आता कोरोनाची क्वीन झाली आहे. आयपीएलमध्ये 'किंग्ज इलेव्हन पंजाब'ला पाठिंबा देण्यासाठी अभिनेत्री प्रिती सध्या यूएईमध्ये आहे. प्रितीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती कोरोना टेस्ट करताना दिसत आहे. प्रितीने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''मी कोरोना टेस्ट क्वीन बनले आहे. ही माझी २० वी कोरोना टेस्ट आहे.''

हेही वाचा -Aniket VishwasRao : 'चमेली' तून पदार्पण केलेल्या अनिकेतचा जाणून घ्या जीवनप्रवास...

Last Updated : Nov 18, 2021, 3:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details