नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. गेल्या 16 जानेवरीपासून देशभरात लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. सुरवातील गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना लसीकरणातून वगळण्यात आले होते. त्यामुळे लस कधी मिळणार? हा प्रश्न गर्भवती महिलांना पडला होता. अखेर त्यांची प्रतिक्षा संपली असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गर्भवती महिलांना कोरोना प्रतिबंधक लस द्यायला मान्यता दिली.
कोरोना लसीकरणाविषयीच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीनं याबाबत शिफारस केली होती. त्यानुसार केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कोविन पोर्टलवर पूर्व नोंदणी करून किंवा थेट लसीकरण केंद्रावर जाऊन गर्भवती महिलांना लस घेता येणार आहे. तसेच 18 वयापुढच्या नागरिकांसाठीच्या प्रक्रियेनुसारच गर्भवती महिलांसाठीची ही लसीकरणाची प्रक्रिया असेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट
गर्भवती महिलांना कोरोना लस देण्याबाबत जागरूक केले जाईल. या कामात आरोग्य विभागातील आशा कामगारांसह इंडियन मेडिकल असोसिएशन, महिला फिजीशियन ऑर्गनायझेशन आणि पेडियाट्रिक मेडिकल असोसिएशनचीही मदत घेण्यात येणार आहे. खासगी रुग्णालय चालकांना गर्भवती महिलांना लस देण्यास सांगितले जाईल. आशा कामगारही गर्भवती महिलांना लस घेण्यासाठी प्रवृत करतील.