महाराष्ट्र

maharashtra

दीराला खांद्यावर बसवून गर्भवती महिलेला करायला लावली ३ किमीची पायपीट, बॅटने केली मारहाण

By

Published : Feb 16, 2021, 3:43 PM IST

मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यातील सिरसी पोलीस ठाणे हद्दीत एका गर्भवती महिलेचा सासरच्या लोकांनी छळ केल्याची घटना समोर आली आहे.

pregnant women being beaten in guna madhya pradesh
गर्भवती महिलेच्या खांद्यावर दीराला बसवून करायला लावली ३ किमीची पायपीट, बॅटने केली मारहाण

गुना -मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यातील सिरसी पोलीस ठाणे हद्दीत एका गर्भवती महिलेचा सासरच्या लोकांनी छळ केल्याची घटना समोर आली आहे. सासरच्या लोकांनी गर्भवती महिलेला मारहाण केली. त्यानंतर दीराला खांद्यावर बसवून पीडितेलातीन किलोमीटर चालायला लावले. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण -

पीडित महिलेचे पहिले लग्न बांसखेडी येथील एका तरूणाशी झाले होते. त्यानंतर तिचा दुसऱ्या तरुणाशी साखरपुडा झाला. तेव्हा ती त्या युवकासोबत राहायला गेली. ही बाब पहिले लग्न झालेल्या सासरच्या लोकांना कळाली. तेव्हा त्याच्या सासुरवाडीचे लोक तिथे पोहोचले आणि त्यांनी पीडितेला मारहाण केली. त्यावेळी पीडिता ज्या तरुणासोबत राहत होती. तो तरुण कामा निमित्त बाहेर गेला होता. सासरच्या लोकांनी मारहाण केल्यानंतर त्या पीडितेच्या खांद्यावर दीराला बसवले आणि तिला बांसखेडी या गावाला चालत जायला सांगितले. पीडिता ५ महिन्यांची गर्भवती असून तिने त्या गावापासून ते बांसखेडी हे तीन किलोमीटरचे अंतर दीराला खांद्यावर घेऊन कापले. यादरम्यान, तिला सासरच्या लोकांनी बॅटने मारहाण केली.

पीडित महिला बोलताना...

दरम्यान, या घटनेचे तीन-चार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकरणी सिरसी पोलिसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडिओ...

माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे ट्विट...

गुनामध्ये झालेल्या महिला छळ प्रकरणी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्विट केले आहे. यात त्यांनी, गुना येथील घटना लाजिरवाणी असून मानवतेची हानी करणारी आहे. एका गर्भवती महिलेच्या खांद्यावर एका तरुणाला बसवून त्याची धिंड काढण्यात आली. यादरम्यान पीडितेला लाठी-काठीने मारहाण करण्यात आली, असे म्हटलं आहे.

कमलनाथ यांनी केलेले ट्विट...

या प्रकरणी आणखी एका ट्विटमध्ये कमलनाथ यांनी शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारवर टीका केली आहे. शिवराज जी, आपण कोणत्या राज्यात जगत आहोत, हेच तुमचे सुशासन आहे का? एक महिलेसोबत हा कसा अमानवी व्यवहार होत आहे. एका महिलेची अशा प्रकारे धिंड काढली जाते आणि कोणीही याला रोखत नाही. काय तुमचे पोलीस प्रशासन झोपले आहे, असे अनेक सवाल कमलनाथ यांनी मध्य प्रदेश सरकारला विचारले आहेत. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच यात कारवाई दरम्यान, टाळाटाळ केलेल्या अधिकाऱ्याची चौकशी करण्यात यावी, त्या पीडित महिलेला सुरक्षा प्रदान करण्यासह तिचे उपचार सरकारी खर्चातून करण्यात यावे, अशी मागणी कमलनाथ यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details