महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Pregnant Woman: कापडाची झोळी करून गर्भवतीने नेले रुग्णालयात;व्हिडीओ व्हायरल

कर्नाटकमधील चामराजनगरमध्ये एका गर्भवती महिलेला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी कसलीच सरकारी यंत्रणा मिळाली नाही. दरम्यान, या महिलेला चक्क आठ किलो मिटर अंतरावर असलेल्या रुग्णालयात नेण्यासाठी बांबू आणि कापडापासून बनवलेल्या पालखीचा सहारा घ्यावा लागला आहे.

कापडाची झोळी करून गर्भवतीने नेले रुग्णालयात
कापडाची झोळी करून गर्भवतीने नेले रुग्णालयात

By

Published : Jul 1, 2022, 3:50 PM IST

कर्नाटक - चामराजनगरमध्ये गावकऱ्यांनी बांबू आणि कापडी पालखीच्या साहाय्याने गर्भवती महिलेला आठ किमी अंतरावर असलेल्या रुग्णालयात नेले आहे. रात्रीच्या वेळी घनदाट जंगलाच्या मध्यभागी महिलेला अशा प्रकारे नेले जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना दोडवानी गावातील आहे, जे मलाई महाडेश्वर टेकडी (एमएम हिल) वनपरिक्षेत्राच्या काठावर आहे. दळणवळणाच्या सुविधेअभावी ग्रामीण भागातील नागरिकांना असा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

व्हिडीओ

एका मुलाला जन्म दिला - निर्धारित तारखेपूर्वी शांताला प्रसूती वेदना सुरू झाल्या. एकाही गावकऱ्यांकडे खासगी वाहन नसल्याने मोठी अडचण झाली. काही ग्रामस्थ आणि महिलांनी शांताला काठीच्या साह्याने बनवलेल्या झाळीत रुग्णालयात नेले. कापड आणि लाकडाचा आधार घेऊन त्यांनी पटकन पालखी बनवली आणि शांताला 8 किमी अंतरावर असलेल्या हॉस्पिटलमध्ये नेले. शांताला घनदाट जंगलातून जावे लागले जेथे हत्ती आणि इतर वन्य प्राण्यांनाही धोका आहे. रात्री एक वाजता सुरू झालेला हा प्रवास पहाटे सहा वाजता संपला. शांताला तातडीने आरोग्य केंद्रात नेण्यात आले, जिथे तिने एका मुलाला जन्म दिला.

मोबाईलवर संपर्क होऊ शकला नाही - शासनाने या भागात ‘जन-माणूस’ योजना सुरू केली असून, गावकऱ्यांना आपत्कालीन कामांसाठी ५०० जीप उपलब्ध करून दिल्या जात आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत ते 8 ते 10 किमी अंतर घेतात. मात्र, सिग्नलच्या समस्येमुळे त्याचा मोबाईलवर संपर्क होऊ शकला नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा -India-China Border: चीन-भारताच्या सीमेजवळ तिबेटमधील लोकसंख्येच्या प्रकल्पाला गती

ABOUT THE AUTHOR

...view details