बंगळुरू - देशात कोरोनाचा कहर असून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहेत. अनेकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर संबंधित रुग्णांच्या संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळत आहे. पतीचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर गर्भवती असलेल्या पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना कर्नाटकाच्या बसवेश्वर नगरमध्ये ही घटना घडली आहे. नंदिनी असे मृत महिलेचे नाव आहे.
नंदिनीचे दोन वर्षांपूर्वी म्हैसूर येथील व्यावसायिक सतीशशी लग्न झाले होते. पतीच्या निधनानंतर नंदिनीला मानसिक धक्का बसला होता. तीची आई आणि लहान बहिण तीचा सांभाळ करत होती.