महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Rain in Maharashtra: आजपासून पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळणार! वाचा सविस्त कुठे पडणार पाऊस - महाराष्ट्रात कोणत्या भागात किती पाऊस होणार

नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या महाराष्ट्रातील प्रवेशाची प्रतीक्षा सुरू असतानाच राज्यभरात तापमानाचा पारा वाढून पावसाळापूर्व काहिली निर्माण झाली आहे. ( Pre-monsoon rains ) महाराष्ट्रामध्ये आजपासून (दि, 6) जूनपासून पुणे, नगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, परभणी, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, त्याचप्रमाणे विदर्भात काही भागांत पूर्वमोसमी सरी कोसळण्याची शक्यता आहे.

आजपासून पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळणार
आजपासून पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळणार

By

Published : Jun 6, 2022, 8:37 AM IST

पुणे : नैर्ऋत्य मोसमी पावसाची सध्या प्रतीक्षा आहे. राज्यभरात तापमानाचा पारा वाढून पावसाळापूर्व काहिली निर्माण झाली आहे. उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रवाहामुळे जम्मूपासून विदर्भापर्यंत उष्णतेची लाट कायम आहे. महाराष्ट्रामध्ये आजपासून (दि, 6) जूनपासून पुणे, नगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, परभणी, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, त्याचप्रमाणे विदर्भात काही भागांत पूर्वमोसमी सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मोसमी पावसाचे वातावरण असताना सध्या देशामध्ये परस्परविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये दोन दिवसांपासून उष्णतेची लाट तीव्र आहे. बर्फाच्छादित प्रदेश समजल्या जाणाऱ्या जम्मू आणि हिमाचल प्रदेशापासून थेट विदर्भापर्यंत सध्या उष्णतेची लाट आहे. विदर्भात देशातील उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणाचा दक्षिण भाग, दिल्ली, उत्तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिसा, छत्तीसगडसह विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. पुढील दोन दिवस तापमानातील वाढ कायम राहणार असून, त्यानंतर २ ते ३ अंशांनी तापमानात घट होईल. विदर्भात उष्णतेची लाट निवळताना विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे.

उत्तरेपासून मध्य भारतापर्यंत उष्णतेची लाट असताना पूर्वोत्तर राज्ये आणि दक्षिणेकडील काही भागांमध्ये सध्या मोसमी आणि पूर्वमोसमी पावसाची हजेरी आहे. मेघालयमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हिमालयाच्या उपविभागात पाऊस होत आहे. केरळ आणि दक्षिण कर्नाटकमध्येही पावसाचा जोर कायम आहे. महाराष्ट्रामध्ये आजपासून (दि, 6) जूनपासून पुणे, नगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, परभणी, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, त्याचप्रमाणे विदर्भात काही भागांत पूर्वमोसमी सरी कोसळण्याची शक्यता आहे. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत ८ जूनपासून पाऊस जोर धरू शकतो, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

ब्रह्मपुरी, गोंदिया ४६.२ अंश सेल्सिअस -विदर्भातील ब्रह्मपुरी आणि गोंदिया भागात राज्यातील उच्चांकी तापमान आहे. रविवारी या भागांत प्रत्येकी ४६.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. नागपूरमध्ये ४५.२, तर वर्धा येथे ४५.० अंश तापमान नोंदवले गेले. अकोला आणि अमरावती येथे अनुक्रमे ४४.८, ४४.२ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी येथे ४३.३, तर औरंगाबाद आणि नांदेड येथे ४१ अंशांवर तापमान होते. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे ४३.० अंश, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर येथे ४१ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबई परिसर आणि कोकणात कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या पुढे गेला आहे.

हेही वाचा -Prices of vegetables: भाजीपाल्याचे दर वाढले; वाचा सविस्तर आजचे नवे दर

ABOUT THE AUTHOR

...view details