मुंबई - अतिपावसाचा फटका भाजीपाला पिकाला बसला आहे. त्यामुळे आवक मंदावली आहे. परिणामी भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. एरवी 30 ते 40 रुपये किलो मिळणारा भाजीपाला 70 ते 80 रुपये झाला आहे. ( vegetables were destroyed ) त्यामुळे सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करणे कठीण झाले आहे. विशेषत: ढबू, काकडी, गवार, बिन्स, दोडकी, टोमॅटो, मेथी आदी भाजीपाल्यांचे दर कडाडले आहेत.
- भाजीपाल्याचे दर खालीलप्रमाणे
- ढबू ८० रुपये किलो,
- काकडी ८० रुपये किलो
- दोडकी ६० रुपये किलो
- कांदे २० रुपये किलो
- गवार ८० रुपये किलो
- बिन्स ८० रुपये किलो
- ओली मिरची ५० रुपये किलो
- वांगी ४० रुपये किलो
- टोमॅटो ६० रुपये किलो
- भेंडी ५० रुपये किलो
- बटाटा ५३ रुपये किलो
- कारली ४० रुपये किलो
- कोबी १० रुपये
- फ्लॉवर २० रुपयांना १
- कोथिंबीर २० रुपये पेंडी
- कांदापात १० रुपये पेंडी
- मेथी ३० रुपये पेंडी
- शेपू २० रुपयाला १ पेंडी
- १० रुपयाला ४ लिंबू