प्रयागराज ( उत्तरप्रदेश ) : जिल्ह्यातील करचना भागातील देहा गावात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिथे कुटुंबीयांनी आपल्या 18 वर्षीय मुलीचा मृतदेह केवळ तंत्र-मंत्राद्वारे जिवंत करू, या अंधश्रद्धेतून 3 दिवस घरातच ( Daughters Dead body Locked In Room ) ठेवला. मात्र, मंगळवारी सायंकाळी गावकऱ्यांना ही बाब समजताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी हे भयानक दृश्य पाहिल्यावर सगळेच हादरले. सध्या पोलीस मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून नातेवाईकांची चौकशी करत आहेत.
मृत्यू 3 दिवसांपूर्वीच झाला होता :अभयराज यादव हे करचना पोलीस स्टेशन हद्दीतील दिहा गावात कुटुंबासह राहतात. सूत्रांनुसार, अभयराजची मुलगी 18 वर्षीय दीपिका हिचा 3 दिवसांपूर्वी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. 3 दिवस कुटुंबीयांनी दीपिकाचा अंत्यसंस्कार केला नाही, ही बाब मंगळवारी गावकऱ्यांना समजली. घरातच तंत्र-मंत्राद्वारे आपल्या मुलीला जिवंत करण्याचा प्रयत्न कुटुंबीय करत असल्याची माहिती मिळाली.