लखनौ - राजकारणातील चाणक्य समजले जाणाऱ्या प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत धक्कादायक वक्तव्य केले आहे. त्यामुळे काँग्रेसमधील नेतृत्वाबाबत अधिक वाद होण्याची शक्यता आहे.
राजकीय रणनीतीतज्ज्ञ प्रशांत किशोर एका माध्यमांशी बोलताना म्हणाले, की प्रियंका गांधी या हुबेहुब त्यांच्या आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिसतात. त्यांच्यामध्ये कणखर नेतृत्व सामान्यांना दिसत आहे. कदाचित या गुणांमुळे खासदार राहुल गांधी यांना त्यांच्याबद्दल भीती वाटते. त्यामुळे प्रियंका गांधींना 2017 च्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होऊ दिला नाही.
हेही वाचा-'मोदींना सांगणार, लोक तुम्हाला शिव्या देतात' - खासदार संजय राऊत
प्रशांत किशोर म्हणाले, की राहुल गांधींची प्रथम पाटणामध्ये भेट घेतली होती. त्यांना काँग्रेससाठी काम करण्याबाबत विचारले होते. राज्यात राजकीय स्थिती चांगली होती. विशेषत: काँग्रेसच्या विरोधात स्थिती होती. दुर्दैवाने त्वरित दुरुस्ती होईल, अशी तिथे स्थिती नाही. सर्वात जुन्या पक्षाच्या मुळात समस्या आणि संरचनात्मक दुर्बलस्थाने आहेत. यावेळी प्रशांत यांनी मोदी सरकारवरही टीका केली. ते म्हणाले, की देश वाईट स्थितीला सामोरे जाताना आणि अवतीभोवती दु:खदायी स्थिती असताना सकारात्मकतेच्या नावाने प्रोपागंडा राबविला जात आहे. सकारात्मक होत असताना आपण प्रोपांगडा राबविणाऱ्या सरकारसाठी आंधळे होऊ शकत नाही.