नवी दिल्ली - निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. यासंदर्भात आज शुक्रवार(दि. 22 एप्रिल)रोजी ते काँग्रेस हायकमांडशी महत्त्वाची चर्चा करणार आहेत. ( Prashant Kishor Meet The Soniya Gandhi ) दरम्यान, प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या आखलेल्या रणनीतीवर पक्षांतर्गत विचारमंथनही होणार आहे.
बैठक गांधी कुटुंब आणि पीके यांच्यातच होणार - प्रशांत किशोर (पीके) शुक्रवारी सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यामध्ये काँग्रेसमध्ये सामील होण्यावर अंतिम निर्णय होणार असल्याची सुत्राचांची माहिती आहे. ( Prashant Kishor Will Join The Congress ) दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबतची प्रस्तावित बैठक गांधी कुटुंब आणि पीके यांच्यातच होणार आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट - किशोर यांनी यापूर्वी काँग्रेसने काय करावे याबाबत मोठ्या प्रमाणात सादरीकरण केले आहे. दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वढेरा हे देखील पीके काँग्रेसमध्ये सामील होण्याबद्दल जी बैठक होणार आहे त्यामध्ये उपस्थित राहण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते सचिन पायलटही गुरुवारी दिल्लीत पोहोचले असून त्यांनीही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे.
प्रियांका गांधी उपस्थित - प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी आखलेल्या रणनीतीवर पक्षांतर्गत विचारमंथन सुरू आहे. या क्रमाने पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी किशोर यांच्याशी चर्चा केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह, केसी वेणुगोपाल, प्रियांका गांधी आणि अन्य काही नेते उपस्थित होते.
काही दिवसांतच अहवाल - मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कमलनाथ यांनीही सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत किशोर यांच्या विषयावरही चर्चा झाल्याचे समजते. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा हा गट किशोर यांच्या रणनीतीवर चर्चा करत असून, काही दिवसांतच त्यांचा अहवाल सोनिया गांधींना सादर करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
लोकसभा निवडणुकीची ब्लू प्रिंट - गेल्या चार दिवसांत प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधी यांची तिसऱ्यांदा भेट घेतली आहे. तत्पूर्वी, किशोर यांनी पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि शनिवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्व आणि वरिष्ठ नेत्यांसमोर पुढील लोकसभा निवडणुकीची ब्लू प्रिंटही त्यांनी सादर केली होती.
युती करून निवडणूक रिंगणात उतरावे - उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशासारख्या काही राज्यांमध्ये काँग्रेसने आपल्या रणनीतीवर फेरविचार करावा आणि या राज्यांमध्ये युती टाळावी, असा सल्ला किशोर यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. काँग्रेसच्या सूत्रांनुसार, प्रशांत किशोर यांनी त्यांच्या सादरीकरणात असेही म्हटले आहे, की काँग्रेसने लोकसभेच्या सुमारे 370 जागांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये युती करून निवडणूक रिंगणात उतरावे असही ते म्हणाले आहेत.
(2023)ला पुन्हा सरकार स्थापन करू - दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर सचिन पायलट म्हणाले की, राजस्थानमध्ये दोन वर्षांपूर्वी एआयसीसीने स्थापन केलेल्या समितीने अनेक पावले उचलली आहेत. त्याच दिशेने पुढील काम करावे लागेल, जेणेकरून राज्यात 2023 च्या निवडणुकीत आम्ही पुन्हा सरकार स्थापन करू शकतो. यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांशी चर्चा झाली. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप बुलडोझरचे राजकारण करत असल्याचेही त्यांनी सांगितले. हा सर्व प्रकार कायदा व संविधानाचा भंग आहे असही ते म्हणाले आहेत.
हेही वाचा -युक्रेनियन नागरिकांसाठी मदत घेऊन जाणाऱ्या जपानच्या विमानाला भारताने सेवा नाकारली