पाटना - राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर काॅंग्रेस पक्षात जातील अशी गेली पंधरा दिवस चर्चा होती. किशोर यांची काँग्रेस सोबत चर्चाही सुरू होती. मात्र, ही चर्चा फिस्कटल्यावर किशोर काय करणार याची चर्चा होती. ( Political Strategist Prashant Kishor ) त्यावर किशोर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. बिहारसाठी नव्या विचाराची गरज असल्याचे मत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले आहे. पाटणा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नवा पक्ष काढणार नसल्याचे स्पष्ट केले.
Prashant Kishore Press Conference
मी सध्या कोणताही राजकीय पक्ष स्थापन करणार नाही. मात्र, मी 17 हजार लोकांशी बोलणार असल्याचे ते म्हणाले. ( Prashant Kishor On Bihar ) या परिस्थितीत सर्व लोक पक्ष काढण्यास तयार असतील तर पक्ष काढण्याचा विचार केला जाईल. परंतु, तो पक्ष केवळ माझा नसून त्यात योगदान देणाऱ्या सर्व लोकांचा तो पक्ष असेल अस किशोर म्हणाले आहेत.
किशोर म्हणाले की, सध्या मी कोणताही राजकीय पक्ष काढणार नसून 17 हजार लोकांशी बोलणार आहे. या स्थितीत प्रत्येकजण पक्ष स्थापन करण्यास तयार असेल, तर पक्ष स्थापनेचा विचार केला जाईल. बिहारची स्थिती आणि दिशा बदलण्याची गरज आहे. त्यासाठी ते पदयात्रा काढणार असून, त्यादरम्यान ३ ते ४ महिन्यांत १७ हजार लोकांना भेटणार आहेत.
प्रशांत किशोर यांनी 2 ऑक्टोबरपासून बिहारमध्ये 3 हजार किमीची पदयात्रा काढण्याची घोषणाही केली आहे. त्याची सुरुवात पश्चिम चंपारणपासून होईल. बिहारमध्ये सध्या निवडणुका नाहीत, त्यामुळे आता पक्ष स्थापनेबाबत कोणतीही चर्चा होणार नाही, असे ते म्हणाले. मी पुढील तीन-चार वर्षे बिहारच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यात घालवणार आहे असही ते म्हणाले आहेत.
बिहारमधील त्यांचा संक्षिप्त राजकीय कार्यकाळ चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जनता दलापासून सुरू झाला. त्यानंतर त्यांना जेडीयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले. मात्र, 16 महिन्यांनी मतभेद झाल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला. ते (2018)मध्ये जेडीयूमध्ये दाखल झाले होते. पण नितीश कुमार यांच्यासोबतची त्यांची राजकीय खेळी फार काळ टिकली नाही आणि 2020 मध्ये त्यांनी पक्ष सोडला.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासमोर बिहारच्या राजकारणात अनेक आव्हाने आहेत. सर्वात आधी ते एकटे किती दिवस निवडणुकीच्या रिंगणात टिकू शकणार आहेत. कारण युतीशिवाय पीकेला बिहारमध्ये पाय रोवणे कठीण होणार आहे. (2020)च्या बिहार विधानसभा निवडणुकीत बहुवचन पक्षाच्या अध्यक्ष पुष्पम प्रिया चौधरी यांना बिहारच्या जनतेने नाकारले होते. अशा स्थितीत बिहारच्या राजकारणात मजबूत पकड असलेल्या पीकेसमोर भाजप, जेडीयू, आरजेडी, मांझींची हम पार्टी आणि लोजप रामविलास असे दिग्गज पक्ष आहेत.
हेही वाचा -गरजेच्या दहा टक्के कोळसा परदेशातून आयात करा, केंद्र सरकारचा राज्याला अजब सल्ला