नवी दिल्ली:अनेक दिवसांपासून निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा ( Prashant Kishor will join the Congress ) होती. किशोर यांनी अनेकदा काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेतली ( Prashant Kishor meet soniya gandhi ) होती. मात्र त्यांच्यात आणि काँग्रेस मध्ये झालेल्या जोरदार चर्चेनंतर, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेतला ( Prashant Kishor Declined To Join Congress ) आहे.
रणदीप सुरजेवाला यांचं ट्विट : "काँग्रेसच्या अध्यक्षा आणि प्रशांत किशोर यांच्यात झालेल्या प्रेझेंटेशन आणि चर्चेनंतर, एक अधिकार प्राप्त कृती गट 2024 ची स्थापना काँग्रेसमध्ये करण्यात आली आहे. त्यांना ( प्रशांत किशोर ) परिभाषित जबाबदारीसह गटाचा एक भाग म्हणून पक्षात सामील होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते, मात्र त्यांनी नकार दिला. आम्ही त्यांच्या प्रयत्नांचे आणि पक्षाला दिलेल्या सूचनांचे कौतुक करतो, असे ट्विट काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी मंगळवारी केले.