नवी दिल्ली - प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 16 एप्रिल रोजी सोनिया गांधी आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर दोघांची भेट पुन्हा एकदा समोर आली आहे. प्रशांत किशोर आणि सोनिया गांधी यांची आजची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. प्रशांत कुमार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीमुळे राजकीय पेच निर्माण होण्याची चिन्हे मानली जात आहेत. प्रशांत किशोर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती काँग्रेससमोर मांडली आहे. मात्र, विशेष म्हणजे त्यांनी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम न करण्याची देखील घोषणा केली आहे. अशा स्थितीत काँग्रेसमध्ये त्यांची भूमिका काय असेल यावरील साशंकता कायम आहे.
काँग्रेस प्रवेशाची व्यक्त केली इच्छा -निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर (पीके) यांनी संयुक्त राष्ट्रांमध्येही काम केले आहे. किशोर यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी 16 एप्रिल रोजी वरिष्ठ नेत्यांसमोर पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. सोनिया गांधी यांच्याशिवाय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, के.सी. वेणुगोपाल, ज्येष्ठ नेते अंबिका सोनी, मल्लिकार्जुन खरगे आणि अन्य काही नेते उपस्थित होते. पीके यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीची ब्लू प्रिंट काँग्रेससमोर मांडली. त्यांनी मांडलेल्या योजनेवर विचार करण्यासाठी पक्ष नेत्यांचा एक गट तयार करेल, जो एका आठवड्यात आपला अहवाल सोनिया गांधींना सादर करेल. किशोर यांच्या निवडणुकीची रणनीती आणि त्यांच्या पक्षात प्रवेश करण्याबाबत काँग्रेस नेतृत्व लवकरच निर्णय घेणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
हेही वाचा -Swamy On Modi : स्वामींचा प्रहार! म्हणाले, पंतप्रधान मोदी आर्थिक विकासात अपयशी