मुंबई -बाबरी मशीद पाडली तेव्हा कुठल्या बिळात होते. ढाचा पाडायच्या वेळी मी तिथेच होतो. तेव्हा एकही शिवसेनेचा नेता गेला नाही, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadnavis ) मुख्यमंत्री ठाकरेंवर केली ( Devendra Fadnavis criticizes CM Uddhav Thackeray ) आहे. यावेळी त्यांनी बाबरी पाडण्याप्रकरणी तुरुंगातही जाऊन आल्याचे सांगितले. या वक्तव्यावर ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण ( Prashant Bhushan ) यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. मशीद उद्ध्वस्त करणाऱ्या गुन्हेगारी टोळीचा भाग असल्याचा फडणवीसांचा गौरव आहे, असे ट्वीट भूषण यांनी केली आहे.
मशीद उद्ध्वस्त करणाऱ्या गुन्हेगारी टोळीचा भाग असल्याचा फडणवीसांचा गौरव - प्रशांत भूषण - Chief Minister Uddhav Thackeray
बाबरी मशीद पाडली तेव्हा कुठल्या बिळात होते. ढाचा पाडायच्या वेळी मी तिथेच होतो. तेव्हा एकही शिवसेनेचा नेता गेला नाही, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadnavis ) मुख्यमंत्री ठाकरेंवर केली ( Devendra Fadnavis criticizes CM Uddhav Thackeray ) आहे. यावेळी त्यांनी बाबरी पाडण्याप्रकरणी तुरुंगातही जाऊन आल्याचे सांगितले. या वक्तव्यावर ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण ( Prashant Bhushan ) यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. मशीद उद्ध्वस्त करणाऱ्या गुन्हेगारी टोळीचा भाग असल्याचा फडणवीसांचा गौरव आहे, असे ट्वीट भूषण यांनी केली आहे.
प्रशांत भूषण
मुंबईतील सोमैया मैदानात भाजपातर्फे आयोजित महाराष्ट्रदिन सन्मान सोहोळा सभा रविवारी (दि. 1 मे) झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, ते म्हणतात आम्ही बाबरी पाडली. काय विनोद आहे? बाबरी पाडल्याबद्दल ज्या 32 नेत्यांवर आरोपपत्र दाखल झाले त्यात तुमचा एक महाराष्ट्राचा नेता दाखवा, असे आवाहन फडणवीस यांनी शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांना केले.