महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Praniti Shinde on Women Reservation Bill: ... तर मोदी सरकारनं विधेयक आधीच मंजूर केलं असतं- प्रणिती शिंदे - BJP propaganda PM Modi

Praniti Shinde on Women Reservation Bill : काँग्रेस कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित प्रणिती शिंदे यांनी महिला आरक्षणाच्या विधेयकावरून भाजपावर निशाणा साधलाय. त्या म्हणाल्या पंतप्रधान महिलांच्या सक्षमीकरणाबाबत गंभीर असते, तर ते विधेयक आधीच मंजूर करू शकले असते. त्या असं का म्हणाल्या ते जाणून घेऊ या.

Praniti Shinde on Women Reservation Bill
महिला आरक्षण विधेयकावर प्रणिती शिंदे

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2023, 8:33 PM IST

Updated : Sep 20, 2023, 8:55 PM IST

नवी दिल्लीPraniti Shinde on Women Reservation Bill :महिला आरक्षण विधेयकावरून 2024 च्या निवडणुकीत भाजपाला फायदा मिळवायचा आहे. परंतु, काँग्रेस याला विरोध करेल, असं कॉंग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी सांगितलंय. हे विधेयक 2010 साली मनमोहन सिंग यांचं सरकार असताना मंजूर झालं होतं. ते राज्यसभेत मंजूर झालं, पण आम्ही ते लोकसभेत मंजूर करू शकलो नाही. तेव्हा भाजपा आणि पक्षांनी या विधेयकाला विरोध केला होता. तेव्हापासून हे विधेयक प्रलंबित होत. 2014 पासून लोकसभेत भाजपाचं प्रचंड बहुमत आहे, असं महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि काँग्रेस कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित प्रणिती शिंदे यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधताना सांगितलंय.

भाजपाचा मुकाबला करणार :2024 च्या लोकसभा निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून पंतप्रधानांनी हे विधेयक आता आणलंय. भाजपा हे विधेयक मंजूर करून जाहीर करण्याचा प्रयत्न करेल, हे आम्हाला माहीत आहे. पण आम्ही देशभरात त्यांच्या प्रचाराचा मुकाबला करू. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी आज लोकसभेत केलेलं भाषण देशभरातील आमच्या दाव्याचा आधार ठरेल. हे आमचं विधेयक आहे, असं त्या म्हणाल्या.

काँग्रेसचा महिला सक्षमीकरणाला पाठिंबा :काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंनी आरोप केलाय की, भाजपा मुळातच महिलाविरोधी आहे. लोकसभेचे खासदार योगी आदित्यनाथ तेव्हा महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात बोलत होते. त्यांचे 90 टक्के खासदार विरोधात होते. काँग्रेस नेहमीच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करतंय. खरं तर आपले माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंचायती राज संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची कल्पना पुढे आणली होती. आज देशभरातील ग्रामपंचायतींमध्ये लाखो महिला प्रमुख निवडून आल्या आहेत, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

  • महिलांच्या हिताच्या योजना :राहुल गांधी आणि प्रियांका गांधी देशभरातील महिला मतदारांना सक्षम करण्यासाठी 'आधी अबादी, पुरा हक' ही घोषणा देत आहेत. 2024 च्या राष्ट्रीय निवडणुकीपूर्वी ते त्या योजनेवर काम करत राहतील. पंचायतींव्यतिरिक्त, गेल्या काही वर्षांत काँग्रेसच्या विविध राज्य सरकारांनी महिलांच्या हिताच्या योजना राबवल्या आहेत, असं प्रणिती शिंदेंनी सांगितलं.

40 टक्के महिलांना तिकिटे :त्या म्हणाल्या की काँग्रेस जे म्हणते, ते करते. 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना सक्षम करण्यासाठी प्रियंका गांधींनी 'लडकी हूं, लड सकती हूं' ही मोहीम सुरू केलीय. विरोध असूनही 40 टक्के महिलांना तिकिटे दिली होती. ही एक अत्यंत यशस्वी मोहीम होती. पण, त्यामुळं निवडणूक निकाल आला नाही. आम्ही इतर राज्यांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त महिलांना तिकिटे दिली. 84 सदस्यीय काँग्रेस कार्यकारिणीत 15 महिलांचा समावेश करून त्यांना पक्षाच्या महत्त्वाच्या भूमिका दिल्या, असं त्यांनी सांगितलंय.

हेही वाचा :

  1. Supriya Sule slammed BJP : सुप्रिया सुळे यांनी संसदेत चंद्रकांत पाटील यांच्या 'त्या' वक्तव्यावरून उपस्थित केला प्रश्न
  2. Political leaders on Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावर 'या' राजकीय नेत्यांनी केलंय मोदी सरकारचं अभिनंदन
  3. Rahul Gandhi on women reservation: महिला आरक्षणात ओबीसींना आरक्षण देण्याची राहुल गांधींची मागणी, अमित शाह म्हणाले...
Last Updated : Sep 20, 2023, 8:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details