महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Prakash Singh Badal: भाजपला राजकीयदृष्ट्या 'अस्पृश्य' बोलले जात असताना प्रकाशसिंग बादलांनी दिली साथ - Badal had a special relationship Advani

एक काळ असा होता की भाजपला राजकीयदृष्ट्या 'अस्पृश्य' म्हटले जायचे. अशा स्थितीत प्रकाश सिंग बादल यांनी भाजपशी युती करून पक्षाला मोठा दिलासा दिला. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याशी आपले खास नाते असल्याचे बादल म्हणाले होते. हे संबंध केवळ राजकीय नसून, विचारधारेवर असल्याचेही ते म्हणाले होते.

Prakash Singh Badal
प्रकाशसिंग बादल अन् वाजपेयी अडवाणी

By

Published : Apr 26, 2023, 6:19 PM IST

नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल हे एनडीएचे संस्थापक सदस्य होते. भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी त्यांचे विशेष संबंध होते. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी अनेक प्रसंगी आपल्या सहकार्याने एनडीएला राजकीय अडथळ्यांपासून वाचवले. 1996 मध्ये पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीनंतर भाजप आणि अकाली दल एकत्र आले. 1997 मध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजप आणि अकाली दल एकत्र लढले आणि ही युती सत्तेपर्यंत पोहोचली होती.

तिन्ही नेत्यांना एकमेकांबद्दल पूर्ण आदर : 1996 मध्ये एचडी देवेगौडा यांनी प्रकाशसिंग बादल यांना त्यांच्या आघाडीत सामील होण्याची विनंती केली. पण तेव्हा बादल म्हणाले होते की, आम्ही भाजपसोबत जात आहोत, आम्ही काँग्रेससोबत कधीच युती करू शकत नाही. तसेच, वाजपेयी आणि अडवाणी यांच्याशी आपले खास नाते असल्याचे प्रकाशसिंग बादल अनेकदा सांगत असत. तिन्ही नेत्यांना एकमेकांबद्दल पूर्ण आदर असल्याचे ते सांगत.

पुढच्या काळात अकाली दल एनडीएतून बाहेर पडला : एका मुलाखतीत बादल म्हणाले होते की, एसएडीची भाजपसोबतची युती केवळ राजकीय नाही, तर विचारधारेवर आधारित आहे. तसेच, याला एकाच शरीराचे दोन भाग आहेत असे आपण मानू शकता. आमची युती केवळ विजयाची भागीदार नाही, तर पराभवानंतरही कायम राहणार असल्याचे बादल म्हणाले होते. परंतु, पुढच्या काळात अकाली दल एनडीएतून बाहेर पडला ही वेगळी बाब वेगळी आहे. कृषी विधेयकाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांची मते भिन्न होती. त्याच मुद्दयावर ते वेगळे झाले.

प्रकाशसिंग बादल यांचा अशिर्वाद घेतला : हे सगळे झाले असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकाशसिंग बादल यांच्याशी वैयक्तिक संबंध कायम ठेवले होते. ते अनेकदा त्यांच्या तब्येतीची चौकशी करत असत. 26 एप्रिल 2019 रोजी नरेंद्र मोदी वाराणसीमधून उमेदवारी दाखल करत असताना त्यांनी प्रकाशसिंग बादल यांचा अशिर्वाद घेतला होता. यावरूनही त्यांच्यातील संबंधाचा अंदाज लावता येतो. आजारी असतानाही बादल वाराणसीला पोहोचले होते. तसेच, अमित शहा गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज भरत होते, तेव्हाही बादल तेथे उपस्थित होते आणि अमित शाह यांनी त्यांचे त्यावेळी आशीर्वाद घेतले होते.

हेही वाचा :Parkash Singh Badal Death : पंतप्रधान मोदींनी प्रकाश सिंग बादल यांना वाहिली श्रद्धांजली

ABOUT THE AUTHOR

...view details