मियामी: भारताचा युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंधाला रविवारी चॅम्पियन्स बुद्धिबळ टूरच्या एफटीएक्स क्रिप्टो कपच्या ( FTX Crypto Cup ) सहाव्या फेरीत पराभव पत्कारावा ( Defeat of Pragyanandha in sixth round ) लागला. त्याला पोलंडच्या जॅन क्रिस्टोफ डुडाने ( Poland Jan Kristof Duda ) टायब्रेकमध्ये मात दिली. 17 वर्षीय प्रज्ञानानंधा या स्पर्धेतील हा दुसरा पराभव आहे. त्याला शेवटच्या फेरीत क्वांग लिम लेकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, हा भारतीय खेळाडू 13 गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल मॅग्नस कार्लसन 15 गुणांसह पहिल्या स्थानावर ( Magnus Carlsen leads with 15 points ) आहे. डुडाने पहिला गेम जिंकून लवकर आघाडी घेतली. यानंतर पुढील दोन सामने अनिर्णित राहिले. प्रज्ञानानंधाने चौथा गेम जिंकून सामना बरोबरीत आणला. पण पोलंडच्या खेळाडूने टायब्रेकमध्ये आपला अनुभव दाखवत 4-2 असा विजय मिळवला.