महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Praggnanandhaa Interview: प्रज्ञानंद कधी होणार विश्वविजेता? वाचा, सविस्तर मुलाखत - R Praggnanandhaa goal

Praggnanandhaa Interview: रमेशबाबू प्रज्ञानंद सध्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेनिमित्त कोलकात्यात आहे. तिथं त्याने माध्यमांशी संवाद साधलाय. चला तर प्रज्ञानंदबद्दल सविस्तर जाणून घेवू या.

world champion R Praggnanandhaa
रमेशबाबू प्रज्ञानंध

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2023, 9:42 PM IST

कोलकाताPraggnanandhaa Interview: रमेशबाबू प्रज्ञानंद हा भारतीय क्रीडा क्षेत्रातील नवा पोस्टर बॉय आहे. वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनबरोबर पराभव झाल्यानंतर देखील प्रज्ञानंद कोलकाता येथे टाटा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेलाय. स्पर्धेदरम्यान, प्रज्ञानंदने पत्रकारांसोबत 45 मिनिटं संवाद साधला. तेव्हा त्याच्या बुद्धिबळाच्या जीवनातील अनेक अज्ञात गोष्टी चर्चेत आल्या आहेत.

चाहत्यांच्या आणि देशवासीयांच्या अपेक्षा वाढल्या :सध्याच्या टाटा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेबद्दल बोलताना तो म्हणाला की, या स्पर्धेबद्दल तो फारसा विचार करत नाही. त्याचा संघ खूप मजबूत आहे. त्याच्याकडे विश्वविजेते बनण्याची सर्व कौशल्यं आणि क्षमता आहेत. तो म्हणाला की, काही वर्षांत ही स्पर्धा जिंकेन. त्याच्याकडून चाहत्यांच्या आणि देशवासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पण याचे त्याला दडपण वाटत नाही. तो प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक खेळात तो सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतोय.

कार्लसनकडून शिकण्याचा प्रयत्न :कार्लसन हा ऑनलाइन बुद्धिबळ किंवा ऑफलाइन बुद्धिबळ दोन्हीमध्ये खूप मजबूत आहे. मी नेहमीच कार्लसनकडून शिकण्याचा प्रयत्न करत असतो. गेल्या 10 वर्षांपासून तो जागतिक बुद्धिबळावर वर्चस्व गाजवत आहे. तो काय करतोय, कुठल्या योजनेशी खेळतोय हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय. मी त्याला अनेक प्रश्न विचारले, पण तो अजिबात विचलित झाला नाही, असंही प्रज्ञानंद (R Praggnanandhaa Diet) म्हणाला.

मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत :या विश्वचषकात मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप कमकुवत होतो. त्यामुळे मी खूप मागे पडलो. जर तुम्ही कमजोर असाल तर तुम्ही बुद्धिबळ खेळू शकत नाही, असंही तो म्हणाला. मी बरेच दिवस विशी सरांच्या अकादमीत राहिलो. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं. आम्ही बुद्धिबळाशी संबंधित सर्व गोष्टींवर चर्चा करतो. जसं की, मी सामन्याच्या आदल्या दिवशी काय करावं, कोणता आहार आवश्यक आहे, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत राहण्यासाठी काय केलं पाहिजे. या बाबींवरही त्यांच्याशी चर्चा केलीय. मी अजूनही त्याच्या खेळानं प्रेरित आहे.

भारतीय संघ नि:संशय मजबूत :बुद्धिबळ व्यतिरिक्त मला क्रिकेटही खूप आवडते. मी भारतीय संघाचे सामने चुकवत नाही. माझा आवडता क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन आहे. आता संघात मी, गुकेश, अर्जुन आणि निहाल आहे. भारतीय संघ नि:संशय मजबूत आहे. आमची तयारी खूप चांगली झालीय. शिबिरातून खूप काही शिकायला मिळालं. कोलकाता मला आकर्षित करतो. 2018 मध्ये या शहरात आल्यावर मला समजलं होतं की, बुद्धिबळ किती कठीण असतं. टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा ही देशातील सर्वोत्कृष्ट स्पर्धांपैकी एक आहे. मला आणखी सुधारणा करायची आहे. मला येणाऱ्या बुद्धिबळपटूंसाठी प्रेरणा बनायचं आहे.

आईच्या हातचं जेवण :मी जिथे जातो, तिथे माझी आई इंडक्शन ओव्हन घेऊन जाते. ती विविध पदार्थ बनवते. मला माझं आवडतं जेवण मिळालं नाही, तर त्रास होतो. मी चांगला खेळतोय की नाही हे माझ्या चेहऱ्याकडं पाहून आईला कळतं. मी नियमितपणे योग आणि ध्यान करतो. कधीही व्हिडिओ गेम खेळत नाही. व्हिडिओ गेम खेळल्याने अनेक समस्या निर्माण होतात. मी आराम करण्यासाठी चांगले चित्रपट पाहतो. मी आहाराबद्दल जास्त विचार करत नाही, परंतु भारतीय जेवणाचा आनंद घेतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी छान बोलणं झाले. त्यांना माझ्या प्रशिक्षणाबद्दल जाणून घ्यायचं होतं. ते माझ्या वडिलांशी आणि आईशी देखील बोलले, असं प्रज्ञानंदनं (R Praggnanandhaa goal) सांगितलं.

हेही वाचा :

  1. FIDE Chess World Cup Final : भारतीय युवा बुद्धीबळपटू रमेशबाबू प्रज्ञानंदची अंतिम सामन्यात धडक, 'या' अव्वल खेळाडूसोबत होणार सामना
  2. FIDE World Cup 2023 : मॅग्नस कार्लसन 'बुद्धिबळ विश्वविजेता'; भारताच्या आर प्रज्ञानंदचा पराभव
  3. FTX Crypto Cup प्रज्ञानानंधा जेतेपदापासून राहिला वंचित, अंतिम फेरीत कार्लसनचा केला पराभव

ABOUT THE AUTHOR

...view details