महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Pradosh Vrat 2023 : 'या' रविवारला आहे प्रदोष व्रत, जाणून घ्या 2023 मधील संपूर्ण वर्षातील प्रदोष व्रतांची यादी - Madhukrushna Trayodashi 2023

मार्च महिन्यातील दुसरे प्रदोष व्रत येत्या 19 मार्चला 2023, रविवार रोजी आहे. भगवान शिवाचा आशीर्वाद घेण्यासाठी हे व्रत पाळले जाते.

Pradosh Vrat 2023
रविवारला आहे प्रदोष व्रत

By

Published : Mar 12, 2023, 11:37 AM IST

हैदराबाद :प्रदोष व्रत हे हिंदू धर्मात पाळले जाणारे व्रत आहे. हे व्रत भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी पाळले जातात. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्यात दोनदा येते. प्रदोष व्रत सोमवारी असल्यास त्याला 'सोम प्रदोष व्रत' म्हणतात. जर ते मंगळवारी असेल तर त्याला 'भूम प्रदोषम व्रत' म्हणतात आणि जर ते व्रत शनिवारी असेल, तर त्याला 'शनि प्रदोषम व्रत' म्हणतात. हे व्रत सूर्यास्ताच्या वेळेवर अवलंबून असते.

प्रदोष व्रत पूजा तिथी :प्रदोष व्रतामध्ये संध्याकाळी सूर्यास्ताच्या ४५ मिनिटे आधी आणि सूर्यास्तानंतर ४५ मिनिटांपर्यंत भगवान शिवाची पूजा केली जाते. रविवार, 19 मार्च 2023 रोजी येणारे व्रत हे कृष्ण पक्ष प्रदोष व्रत (मधु कृष्ण त्रयोदशी) आणि रवि प्रदोष व्रत आहे. प्रदोष व्रत शुभ तिथी 19 मार्च रविवार रोजी सकाळी 08:07 पासून सुरू होऊन, 20 मार्च 2023 रोजी सकाळी 04:55 पर्यंत राहील. ज्योतिष्य शास्त्रानुसार भगवान शंकराच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जाणारा प्रदोष काल 19 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 06.31 ते रात्री 08:54 पर्यंत असणार आहे. 2023 मधील प्रदोष व्रतांची यादी :कृष्ण पक्ष प्रदोष व्रत (मधु कृष्ण त्रयोदशी), रवि प्रदोष व्रत - रविवार, 19 मार्च 2023 . 19 मार्च 2023 सकाळी 08:07 वाजता - 20 मार्च 2023 सकाळी 04:55 वाजता पर्यंत असेल.

  • एप्रिलमध्ये प्रदोष व्रताची तारीख : शुक्ल पक्ष प्रदोष व्रत- सोमवार, 03 एप्रिल 2023. 03 एप्रिल 2023 सकाळी 06:24 ते 04 एप्रिल 2023 सकाळी 08:05 वाजता पर्यंत असेल.
  • कृष्ण पक्ष प्रदोष व्रत - सोमवार, १७ एप्रिल २०२३ . 17 एप्रिल 2023 दुपारी 03:46 वाजता - 18 एप्रिल 2023 दुपारी 01:27 वाजता पर्यंत असेल.
  • मे महिन्यात प्रदोष व्रताची तारीख : शुक्ल पक्ष प्रदोष व्रत - बुधवार, 03 मे 2023 . 02 मे 2023 रात्री 11:18 वाजता - 03 मे 2023 रात्री 11:50 वाजता पर्यंत असेल.
  • कृष्ण पक्ष प्रदोष व्रत - बुधवार, 17 मे 2023 . १६ मे २०२३ रात्री ११:३६ ते १७ मे २०२३ रात्री १०:२८ वाजता पर्यंत असेल.
  • जूनमध्ये प्रदोष व्रताची तारीख : शुक्ल पक्ष प्रदोष व्रत, गुरु प्रदोष व्रत- गुरुवार, 01 जून 2023 . 01 जून 2023 दुपारी 01:39 ते 02 जून 2023 दुपारी 12:48 वाजता पर्यंत असेल.
  • (कृष्ण पक्ष प्रदोष) गुरु प्रदोष व्रत - गुरुवार, १५ जून २०२३. 15 जून 2023 सकाळी 08:32 ते 16 जून 2023 सकाळी 08:40 वाजता पर्यंत असेल.
  • जुलैमध्ये प्रदोष व्रताची तारीख : शुक्ल पक्ष प्रदोष व्रत- शनिवार, 01 जुलै 2023. 01 जुलै 2023 सकाळी 01:17 वाजता - 01 जुलै 2023 सकाळी 11:07 वाजता पर्यंत असेल.
  • कृष्ण पक्ष प्रदोष व्रत, शुक्र प्रदोष व्रत - शुक्रवार, 14 जुलै 2023 . 14 जुलै 2023 संध्याकाळी 07:17 ते 15 जुलै 2023 रात्री 08:33 वाजता पर्यंत असेल.
  • शुक्ल पक्ष प्रदोष व्रत, रवि प्रदोष व्रत :रविवार, 30 जुलै 2023. 30 जुलै 2023 सकाळी 10:34 ते 31 जुलै 2023 सकाळी 07:27 वाजता पर्यंत असेल.
  • ऑगस्टमध्ये प्रदोष व्रताची तारीख : कृष्ण पक्ष प्रदोष व्रत, रवि प्रदोष व्रत - रविवार, 13 ऑगस्ट 2023. 13 ऑगस्ट 2023 सकाळी 08:20 ते 14 ऑगस्ट 2023 सकाळी 10:25 वाजता पर्यंत असेल.
  • शुक्ल पक्ष प्रदोष व्रत -सोमवार, 28 ऑगस्ट 2023. 28 ऑगस्ट 2023 संध्याकाळी 06:23 ते 29 ऑगस्ट 2023 दुपारी 02:48 वाजता पर्यंत असेल.
  • प्रदोष व्रताची तारीख सप्टेंबरमध्ये : कृष्ण पक्ष प्रदोष व्रत, भौम प्रदोष व्रत -मंगळवार, 12 सप्टेंबर 2023 . 11 सप्टेंबर 2023 सकाळी 11:52 ते 13 सप्टेंबर 2023 सकाळी 02:21 वाजता पर्यंत असेल.
  • शुक्ल पक्ष प्रदोष व्रत -बुधवार, 27 सप्टेंबर 2023 . 27 सप्टेंबर 2023 सकाळी 01:46 वाजता - 27 सप्टेंबर 2023 रात्री 10:19 वाजता पर्यंत असेल.
  • ऑक्टोबरमध्ये प्रदोष व्रताची तारीख : कृष्ण पक्ष प्रदोष व्रत - बुधवार, 11 ऑक्टोबर 2023 . 11 ऑक्टोबर 2023 संध्याकाळी 5:37 ते 12 ऑक्टोबर 2023 संध्याकाळी 07:54 वाजता पर्यंत असेल.
  • शुक्ल पक्ष प्रदोष व्रत, गुरु प्रदोष व्रत -गुरुवार, 26 ऑक्टोबर 2023. 26 ऑक्टोबर 2023 सकाळी 09:44 ते 27 ऑक्टोबर 2023 सकाळी 06:57 वाजता पर्यंत असेल.
  • नोव्हेंबरमध्ये प्रदोष व्रताची तारीख : कृष्ण पक्ष प्रदोष व्रत (धनत्रयोदशी), शुक्र प्रदोष व्रत - शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023 . 10 नोव्हेंबर 2023 दुपारी 12:36 ते 11 नोव्हेंबर 2023 दुपारी 01:58 वाजता पर्यंत असेल.
  • शुक्ल पक्ष प्रदोष व्रत, शुक्र प्रदोष व्रत - शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2023 . 24 नोव्हेंबर 2023 संध्याकाळी 07:07 ते 25 नोव्हेंबर 2023 संध्याकाळी 05:22 वाजता पर्यंत असेल.
  • डिसेंबरमध्ये प्रदोष व्रताची तारीख :कृष्ण पक्ष प्रदोष व्रत, रवि प्रदोष व्रत - रविवार, 10 डिसेंबर 2023 . 10 डिसेंबर 2023 सकाळी 7:13 ते 11 डिसेंबर 2023 सकाळी 07:10 वाजता पर्यंत असेल.
  • शुक्ल पक्ष प्रदोष व्रत, रवि प्रदोष व्रत - रविवार, 24 डिसेंबर 2023. 24 डिसेंबर 2023 सकाळी 06:24 ते 25 डिसेंबर 2023 सकाळी 05:55 वाजता पर्यंत असेल.

हेही वाचा : Sai Baba Darshan Q Complex : साई भक्तांसाठी ११२ कोटींचे हायटेक दर्शन क्यू कॉम्प्लेक्स लवकरच खुले होणार

ABOUT THE AUTHOR

...view details