महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

PRADOSH VRAT 2022 : भगवान शंकर आणि माता पार्वतीला समर्पित प्रदोष व्रत, अशी करा पूजा - RITUAL AND MUHURT

हिंदू कॅलेंडर प्रत्येक महिन्यात दोनदा प्रदोष व्रत (PRADOSH VRAT 2022) येत असते. हे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष या दोन्ही त्रयोदशी तिथीला पाळले जाते. प्रदोष व्रत हे भगवान शंकर आणि माता पार्वतीला समर्पित (DEDICATED TO LORD SHIVA AND PARVATI) असते. या दिवशी कडक उपवास आणि विधिवत पूजा करुन भाविक देवाचा आर्शिवाद घेतात.

PRADOSH VRAT 2022
प्रदोष व्रत

By

Published : Dec 2, 2022, 1:04 PM IST

प्रदोष व्रत हे भगवान शंकर आणि माता पार्वतीला समर्पित (Lord Shive and Parvati) असते. हे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष या दोन्ही त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हिंदू कॅलेंडर महिन्यात दोनदा प्रदोष व्रत ( Pradosh Vrat 2022) येते. या महिन्यातील प्रदोष व्रत 5 डिसेंबर 2022, सोमवार रोजी सकाळी 05.57 वाजता सुरू होईल. तर दुसऱ्या दिवशी मंगळवारला, 06 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 06.47 वाजता संपेल. जाणून घेऊया, कशी केली जाते प्रदोष व्रत (DO PRADOSH VRAT IN THIS WAY) पूजा.

प्रदोष व्रत

प्रदोष व्रत 2022 मुहूर्त (PRADOSH VRAT MUHURT): पंचांगानुसार, मंगळ मासातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी 5 डिसेंबर 2022, सोमवार रोजी सकाळी 05.57 वाजता सुरू होईल. तर मंगळवारी, दुसऱ्या दिवशी 06 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 06.47 वाजता संपेल. या पूजेचा शुभ मुहूर्त 5 डिसेंबर, सोमवार रोजी सायंकाळी 05.33 ते 08.15 पर्यंत राहील.

प्रदोष व्रत

प्रदोष व्रत विधी : प्रदोष व्रताच्या दिवशी उपवास करण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती (PRADOSH VRAT RITUALS) आहेत. पहिली पद्धत म्हणजे भक्त या दिवशी कडक उपवास केल्या जातो. काही लोक रात्रीही जागे राहून देवाची आराधना करतात. प्रदोष व्रताची दुसरी पद्धत म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास केला जातो. संध्याकाळी शंकराची पूजा केल्यावर उपवास सोडला जातो. सूर्यास्ताच्या एक तास आधी भाविक स्नान करतात, स्वच्छ वस्त्र परिधान करतात आणि पूजेसाठी तयार होतात. भगवान शंकराची मूर्ती किंवा फोटोची विधिवत पूजा केली जाते. काही ठिकाणी शिवलिंगाची पूजाही केली जाते. शिवलिंगावर दूध, दही, तूप अश्या पंचअमृताने स्नान घालण्यात येते. त्यानंतर शिवलिंगावर पांढरे चंदन लावून बेलपत्र, मदार, फुले, भांग इत्यादी अर्पण केले जाते. धार्मिक विधीनंतर भक्त प्रदोष व्रत कथा वाचतात किंवा वाचणे शक्य नसते तेव्हा ऐकतात. यावेळी महामृत्युंजय मंत्राचा १०८ वेळा जप केला जातो. पूजा करून आरती केल्या जाते. पूजा संपल्यानंतर भक्त पवित्र राख कपाळावर लावतात. पूजेनंतर शिवमंदिरांनाही भेट देतात.

ABOUT THE AUTHOR

...view details