महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Rajsthan News : वीजेचे बिल न भरल्याने प्रतापगड शहर अंधारात

राजस्थानमधील प्रतापगड येथे नगरपरिषदेने (Nagar Parishad Pratapnagar) वेळीच वीजेचे बील न भरल्याने शहरातील दिव्यांची जोडणी तोडण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत 33 पैकी 5 दिवे बंद करण्यात आले असून यामुळे संपूर्ण शहर अंधारात (Power Cut Due To non payment of Hefty amount ) जाण्याची शक्यता आहे.

pratapgadh rajsthan
pratapgadh rajsthan

By

Published : Mar 27, 2022, 5:37 PM IST

प्रतापगड -राजस्थानमधील प्रतापगड नगरपरिषदेच्या (Nagar Parishad Pratapnagar) दुर्लक्षाचा फटका शहरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. नगर परिषदेच्या वीजबिलाच्या थकबाकीमुळे (Power Cut Due To non payment of Hefty amount ) वीज महामंडळाने शहरातील पथदिव्यांचे कनेक्शन तोडले आहे. विभागाने आतापर्यंत 33 पैकी 5 भागातील दिवे बंद केले असून रविवारी अजून दिवे बंद करण्यात येतील.

प्रतापगड शहर अंधारात

आता वीज कनेक्शन तोडल्यानंतर नगर परिषदेचा एकही अधिकारी उत्तर देण्यास तयार नाही. स्वत:ला हंगामी आयुक्त म्हणवून लोकांना नोटिसा बजावणाऱ्या आयुक्तांनीही आता हात झटकले आहेत. यामुळे नगर परिषदेत कार्यरत कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. प्रत्यक्षात राज्यातील लाईट बिलांपैकी 32 लाख रुपये शहरातील जनतेने भरले असून उर्वरित बिल नगर परिषदेने भरायचे होते. ते अद्याप जमा झालेले नाही. अशा स्थितीत अजमेर विद्युत महामंडळाचे एमडी एनएस निर्माण यांच्या सूचनेवरून प्रतापगड नगरपरिषदेच्या पथदिव्याचे कनेक्शन तोडले आहे. वीज महामंडळाच्या या कारवाईमुळे शनिवारी रात्रीपासून शहर अंधारात आहे.

1 कोटी 78 लाख बिलाची थकबाकी

सहाय्यक अभियंता नारायणसिंग राठोड यांनी सांगितले की, प्रतापगड नगरपरिषदेकडे एकूण 1 कोटी 78 लाख बिलाची थकबाकी होती. त्यापैकी 32 लाख रुपये शहरातील ग्राहकांनी जमा केले असून, वीज महामंडळाकडून 21 लाख रुपयांची व्यवस्था करण्यात आली आहे. नगर परिषदेने 25 लाख रुपयांचे फक्त 1 वेळचे बिल जमा केले आहे. अर्थसंकल्पाच्या अडचणींमुळे यापूर्वी भरवलेला शिवरात्री मेळा नगर परिषदेला पुढे ढकलावा लागला होता. आता नगर परिषदेने वीजबिल वेळेवर न भरल्यास परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. थकबाकीची बिले भरण्यासाठी नगर परिषदेला अनेकदा नोटिसा देण्यात आल्याचेही विद्युत महामंडळाने म्हटले आहे.

हेही वाचा -Yogi Meeting With Chief Secretary : योगी अ‍ॅक्शन मोडमध्ये!सचिवांना कृती आराखडा तयार करण्याचे दिले निर्देश

ABOUT THE AUTHOR

...view details