नवी दिल्ली -फोर्ब्सकडून भारतातील ‘३० अंडर ३०’ अशी एक यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत उत्तर प्रदेशच्या पौलोमी पाविनी शुक्ला यांना स्थान देण्यात आले आहे. पौलोमी पाविनी शुक्ला गेल्या काही वर्षांपासून अनाथ मुलांना शैक्षणिक दृष्ट्या सशक्त करण्यासाठी कार्यरत आहेत. वरिष्ठ आयएएस अधिकारी आराधना शुक्ला यांच्या कन्या आणि युवा आयएएस अधिकारी प्रशांत शर्मा यांच्या त्या पत्नी आहेत. ‘फोर्ब्स’च्या या यादीमध्ये प्रत्येक देशातील ३० वर्षांखालील तरुण-तरुणींचा सन्मान केला जातो. ३० वर्षांखालील ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे, त्यांना या यादीमध्ये स्थान दिले जाते.
गेल्या अनेक वर्षांपासून हे काम करत आहेत. अनाथ मुलांना शिक्षण मिळावे यासाठी मी प्रयत्न करत आहे. मी फोर्ब्सची आभारी आहे. त्यांनी मला हा सन्मान दिला. या माध्यमातून अनाथ मुलांची कहानी लोकांपर्यंत पोहचेल, असे त्या म्हणाल्या. तसेच गरीब अनाथ मुलांना शैक्षणिक दृष्ट्या सशक्त बनवण्याची प्रेरणा आपल्या आई वरिष्ठ आयएएस अधिकारी आराधना शुक्ला यांच्याकडून मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
हरिद्वारमध्ये असताना माझ्या प्रत्येक वाढदिवसाला आई मला अनाथलयात नेत असत. तिथेच माझा वाढदिवस साजरा केला जात. तेथील काही जण माझे मित्र झाले होते. आम्ही सगळे सोबतच मोठे झालो. जेव्हा मी कॉलेजला जायला लागले. तेव्हा त्यातील एका मुलीने शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा मला अनाथ मुले शैक्षणिक दृष्ट्या किती अशक्त आहेत, याची जाणीव झाली आणि मीही मोहिम सुरू करण्याचे ठरवलं, असे पौलोमी पाविनी शुक्ला यांनी सांगितले.
अनाथ मुलांना आरक्षण मिळालं -