बंगळुरू - दुचाकीवरून पडल्याने एका 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. अश्विन असे या तरुणाचे नाव असून, त्याची दुचाकी खड्ड्यात आदळल्याने तो खाली पडला. यात तो गंभीर जखमी झाला होता. उपचाराअभावी सोमवारी त्याचा मृत्यू झाला. ही घटना काल एमएस पाल्या भागात घडली.
हेही वाचा -Ganja Seized : तेलंगाणामार्गे मुंबईला जाणारा गांजा रचकोंडा पोलिसांनी पकडला; एकास अटक
जल मंडळाने हा खड्डा खोदला होता. अश्विनच्या मृत्यूला बीबीएसपी आणि जल मंडळ जबाबदार असल्याचा दावा त्याच्या मित्राने केला आहे.
बीबीएमपी आणि बीडब्ल्यूएसएसबी विरुद्ध तक्रार दाखल
अश्विन हा मूळचा हवेरी येथील रहिवासी आहे. तो बंगळुरूतील एका खासगी कंपनीत काम करायचा. आणि घरचा एकुलता एक मुलगा होता. याप्रकरणी येलाहंका पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आली आहे. अश्विनच्या पालकांनी बीबीएमपी आणि बीडब्ल्यूएसएसबी विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
अश्विन हा हेल्मटविना वाहन चालवत असल्याचे समोर
अश्विन हा हेल्मटविना वाहन चालवत असल्याचे समोर आले आहे. ही बाब एफआयआरमध्ये नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहे. ड्रिंक अँड ड्राईव्हचा अहवाल यायचा आहे. तो आल्यावर दुसरी एफआयआर दाखल केली जाईल, अशी माहिती नॉर्थ झोन ट्राफिकच्या डीसीपी सविता यांनी दिली.
याप्रकरणावर बीबीएमपीचे मुख्य आयुक्त गौरव गुप्ता यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. गुप्ता म्हणाले, ही घटना घडायला नको होती. जल मंडळाच्या चुकीमुळे ही घटना घडली. दोषींवर कडक कारवाई केली जाईल. जल मंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. बीबीएमपीला न कळवता रस्ता खोदल्याने ही घटना घडली आहे. जल बोर्ड आणि बीईएससीओएमसह इतर संस्थांवर यापूर्वीच पाच गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा -Air India Chairman Appointment : एअर इंडियाच्या चेअरमन पदी नटराजन चंद्रशेखरन यांची नियुक्ती
जल मंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार