गाजियाबाद (नवी दिल्ली) -'जो पर्यंत कृषी कायदे हे रद्द केले जात नाहीत तोपर्यंत लखनऊ शहराचे चारही सीमावरील रस्ते बंद करु आणि आंदोलन सुरूच ठेवू' असे वक्तव्य शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केले होते. याला प्रत्युत्तर देताना उत्तरप्रदेश भाजपाने एक पोस्टर शेअर केले होते. यावर संयुक्त किसान मोर्चानेही एक पोस्टर शेअर करत पलटवार केला आहे. 'पळा, पळा शेतकरी येत आहेत, किसान एकता जिंदाबाद' या आशयाचे पोस्टर ट्वीट करून भाजपाला प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपाने शेअर केलेले पोस्टर टिकैतांच्या वक्तव्यावर भाजपाचे प्रत्युत्तर -
उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या विधानाला निवडणुकीशी जोडून पाहिले जात आहे. टिकैत यांनी लखनौच्या चारही सीमेवरील रस्ते बंद करु असे वक्तव्य केले होते. यावर भाजपाने एक ट्वीट केले होते की, "ओ भाई लखनऊ मध्ये येत आहात, तर जरा सांभाळून". अशा आशयाचे एक पोस्टर शेअर केले आहे. भाजपाद्वारे ट्वीट केलेल्या कार्टून मध्ये बाहूबली लिहिलेला एक माणूस म्हणतो की, "ऐकले आहे की लखनऊला जात आहात तुम्ही. तेथे कोणाशी पंगा घेऊ नका, तेथे योगी बसलेला आहे. काटेरी तारेचे कुंपन लावून, त्यावरच पोस्टर लावून ठेवा", या आशयाच्या पोस्टरमधून भाजपाने शेतकऱ्यांना इशारा दिला होता.
संयुक्त किसान मोर्चाने दिले प्रत्युत्तर -
भाजपाने केलेल्या ट्वीटला प्रत्युत्तर देतांना संयुक्त किसान मोर्चाकडूनही एक पोस्टर ट्वीट करण्यात आले आहे. या ट्वीटमध्ये संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत टॅक्टर चालवत आहेत आणि किसान एकता जिंदाबाद असा नारा देत आहेत. त्यांच्यामागे सर्व शेतकरी हे उभे आहेत. पोस्टरमध्ये टॅक्टर घेऊन ते सर्व उत्तरप्रदेशकडे जातांना दिसत आहेत. संयुक्त किसान मोर्चाच्या या पोस्टरमध्ये भगवे कपडे घातलेला एक व्यक्ती विचार करताना उभा असल्याचे दिसत आहे. त्यावेळी तो " पळा, पळा रे शेतकरी येत आहेत", असा विचार करतानाचे दृश्य दाखवण्यात आले आहे.