महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिलासा! कृषी अधिभाराचा फटका नाही, पेट्रोल-डिझेलचे दर मंगळवारी जैसे थे

पेट्रोलवर 2.50 रुपये तर डिझेलवर 4 रुपये कृषी विकास अधिभार लावण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

दिलासा! कृषी अधिभाराचा फटका नाही, पेट्रोल-डिझेलचे दर मंगळवारी जैसे थे
दिलासा! कृषी अधिभाराचा फटका नाही, पेट्रोल-डिझेलचे दर मंगळवारी जैसे थे

By

Published : Feb 2, 2021, 12:34 PM IST

नवी दिल्ली : कृषी विकास अधिभार लावल्यानंतरही देशात मंगळवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झाले नाही. त्यामुळे ग्राहकांसाठी हा थोडासा दिलासा समजला जात आहे.

उत्पादन शुल्कात कपात

पेट्रोल-डिझेलवर लावलेल्या कृषी अधिभाराच्या किंमतीइतकी उत्पादन शुल्कात कपात करण्यात आल्याने ग्राहकांना याचा फटका बसला नाही. पेट्रोलवर 2.50 रुपये तर डिझेलवर 4 रुपये कृषी विकास अधिभार लावण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र उत्पादन शुल्कात तितकीच कपात केल्याने ग्राहकांना याचा फटका बसला नाही.

मंगळवारी दर जैसे थे

यामुळे मंगळवारी राज्यात इंधनाचे दर जैसे थे राहिले. मुंबईत मंगळवारी पेट्रोलचे दर 92.86 रुपये तर डिझेलचे दर 83.30 रुपये इतके राहिले. देशभरातही इंधनाच्या दरात मंगळवारी बदल झाले नाही.

जानेवारीत इंधन दरात 10 वेळा वाढ

नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात इंधनाच्या दरात दहा वेळा वाढ झाली. जानेवारीत पेट्रोल 2.59 रुपयांनी तर डिझेल 2.61 रुपयांनी वाढले.

हेही वाचा -सावधान! बाजारातील 50 टक्के खाद्यतेल भेसळयुक्त! एफडीएच्या कारवाईतून धक्कादायक बाब समोर

ABOUT THE AUTHOR

...view details