महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राज्यसभा निवडणूक! भाजपने तिसरा उमेदवार दिला;घोडेबाजाराची शक्यता - Rajya Sabha candidate from Maharashtra

सध्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. 6 जागेंसाठी मोठी चुरस लागलेली पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजी राजे यांना शिवसेनेने तिकीट नाकारल्यानंतर सर्वच पक्षांत चांगलीच जुंपली आहे. आता भाजपने आपला तिसरा उमेदवार दिल्याने निवडणुच चांगलीच रंगात आल्याचे चित्र आहे.

राज्यसभा निवडणूक
राज्यसभा निवडणूक

By

Published : May 30, 2022, 1:26 PM IST

मुंबई - राज्यसभा निवडणुकीसाठी (rajya sabha election 2022) राज्यात आता चुरस आणखी वाढली आहे. शिवसेनेने दोन उमेदवार मैदानात उतरवले आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी उमेदवार मैदानात आहे. पण, भाजपने आता तिसरी जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील (maharashtra) राज्यसभेच्या 6 जागांसाठी आता 7 उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे.

राज्यसभा निवडणुकीत सहाव्याजागेसाठी शिवसेना विरुद्ध भाजप अशी प्रतिष्ठेची लढत होणार आहे. भाजपने तिसरा अतिरीक्त उमेदवार रिंगणात उतरवला आहे. तेही कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांना. त्यामुळे शिवसेनेचे दुसरे उमेदवार कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आता प्रत्यक्ष मतदान होऊन निवडणुकीत दोघांपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यसभेच्या ६ जागांपैकी २ जागा निवडून आणण्याची मतदान क्षमता भाजपकडे आहे.

भाजपने केंद्रीय मंत्री पियुष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, यापुर्वीच शिवसेनेने छत्रपती संभाजी राजे यांना तिकीट नाकारत शिवसेनेचे संजय राऊत आणि कोल्हापूरचे संजय पवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

काय आहे संख्याबळ? -सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असे महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर, भाजपकडे 113 आमदारांचे संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत.

राज्यसभेच्या एका जागेसाठी42 मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर, भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपने लढवल्यास घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजपने मध्यप्रदेशातून कविता पाटीदार, राजस्थानमधून घनश्याम तिवारी, लक्ष्मीकांत बाजपेयी, राधामोहन अग्रवाल, सुरेंद्र सिंह नागर, बाबुराम निषाद, दर्शना सिंह आणि संगीता यादव यांना उत्तर प्रदेशमधून उमेदवारी दिली आहे. याशिवाय भाजपने उत्तराखंडमधून कल्पना सैनी, बिहारमधून सतीशचंद्र दुबे आणि शंभू शरण पटेल, हरियाणातून कृष्णलाल पनवार यांना उमेदवारी दिली आहे.

महाराष्ट्रातून हे आहेत राज्यसभेचे उमेदवार

  • संजय राऊत (शिवसेना)
  • संजय पवार (शिवसेना)
  • प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी)
  • इम्रार प्रतापग्रही (काँग्रेस)
  • पियुष गोयल (भाजप)
  • अनिल बोंडे (भाजप)
  • धनंजय महाडिक (भाजप)

हेही वाचा -धक्कादायक..! 7 ते 8 कुटुंबांना टाकले वाळीत, सैन्यातील जवानाच्या कुटुंबाचाही समावेश, कोल्हापूर जिल्ह्यातील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details