महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अर्थसंकल्पावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया; जाणून घ्या कोण काय म्हणाले? - अर्थसंकल्पावर काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा सुरु झाली आहे. सदर अर्थसंकल्प मांडल्यानंतर देशातील राजकीय नेत्यांनी यावर संमिश्र मत मांडले आहे.

अर्थसंकल्पावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया
अर्थसंकल्पावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

By

Published : Feb 1, 2021, 5:24 PM IST

नवी दिल्ली -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत तिसरा अर्थसंकल्प सादर केला. भाजप सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तीसरा अर्थसंकल्प होता. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा सुरु झाली आहे. सदर अर्थसंकल्प मांडल्यानंतर देशातील राजकीय नेत्यांनी यावर संमिश्र मत मांडले आहे. भाजपा नेत्यांनी अर्थसंकल्पाची वाहवा केली आहे. तर विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी -

2021 अर्थसंकल्प विलक्षण परिस्थितीत सादर केले गेला आहे. वास्तविकतेची भावना आणि विकासाचा आत्मविश्वास अर्थसंकल्पात आहे. कोरोनाचा सर्व जगाला फटका बसला असून या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये भारताचा आत्मविश्वास दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे, असे मोदी म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी -

लोकांच्या हातात पैसे देण्याचं सरकार विसरलं. मोदी सरकारची योजना भारताची संपत्ती आपल्या भांडवलशाही मित्रांच्या ताब्यात देण्याची आहे, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल -

यंदाचा अर्थसंकल्प हा काही निवडक कंपन्यांना फायदा देणारा संकल्प आहे. हा अर्थसंकल्प हा सामान्य नागरिकांच्या समस्या वाढवण्याचे काम करेल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख तेजस्वी यादव -

हे देश विकणारा अर्थसंकल्प आहे. सरकारी मालमत्ता विक्री करण्याचा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प नसून रेल्वे, विमानतळ, लाल किल्ला, बीएसएनएल, एलआयसी विकल्यानंतर आता बँका, बंदरे, वीज वाहिन्या, राष्ट्रीय रस्ते, स्टेडियम, तेलाच्या पाइपलाइनपासून ते गोदामापर्यंत सर्व विक्री करण्याचा भाजपचा निर्धार आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख तेजस्वी यादव यांची प्रतिक्रिया

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी -

अभूतपूर्व काळात अर्थसंकल्प सादर केला जात असल्यामुळे यातून काही अपेक्षा होत्या. परंतु अभूतपूर्व काळात हा एक सामान्य अर्थसंकल्प आहे. यातून सरकारला खासगीकरणाचा मार्ग अवलंबून स्वत: चा बचाव करायचा आहे, असे चौधरी म्हणाले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ -

कोरोना सारख्या महामारीमध्ये विकास-आधारित अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मी पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांचे आभार मानतो. # बजेट २०२1 मध्ये शेतकरी, तरुण, महिला किंवा गरीब अशा विविध स्तरासाठी तरतुदी आहेत, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री म्हणाले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन -

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आपल्या भाषणात 7 प्रमुख स्तंभाचा उल्लेख केला. यातील आरोग्य हा सर्वांत मोठा स्तंभ आहे. आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूकीत 137 टक्क्यांनी वाढली आहे. मागील वर्षीच्या अंदाजपत्रकापेक्षा 2.47 पट जास्त आहे, असे आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन म्हणाले.

निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत -

भव्य असा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी मांडला. पूर्व-कोविड स्थिती पुन्हा प्राप्त करण्यास हा अर्थसंकल्प मदत करेल. सरकारने यावेळी पायाभूत सुविधांवर आणि मालमत्ता कमाईवर लक्ष केंद्रित केले. हा एक अतिशय व्यावहारिक, तर्कसंगत आणि प्रगतीशील अर्थसंकल्प आहे. मुख्य म्हणजे करात कोणतीही छेडछाड केली गेली नाही आणि नवीन उपकरही लावण्यात आले नाहीत, असे निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत म्हणाले.

निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांची प्रतिक्रिया

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह -

लोकांना या प्रकारच्या अर्थसंकल्पाची अपेक्षा नव्हती. कारण अशा प्रकारे सरकारने यापूर्वी 5 मिनी-अर्थसंकल्प सादर केले होते. कित्येक पॅकेजेस जाहीर केली गेली आहेत. 'आत्मानिर्भर भारत' त्याचाच एक भाग आहे. हे एक चांगले बजेट आहे. त्याचे जितके कौतुक केले जाईल, तितकेच कमी आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details