बंगळुरू - माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र बीवाय विजयेंद्र यांना नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्यात आल्याने त्यांची निराशा झाल्याचे दिसून आले आहे.
माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पांच्या मुलाला मंत्रीपद नाही; राजकीय चर्चेला उधाण - माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा
विजयेंद्रला मंत्रिमंडळात प्रवेश करता येणार नाही. कारण ते आमदारही नाही. शिवाय त्यांना दीर्घ अनुभवही नाही. म्हणूनच, विजयेंद्र यांना 2023 च्या निवडणुकीकरिता पक्ष बांधणीच्या कामांसाठी नियुक्त केले जाईल.
शपथविधीपूर्वी मुख्यमंत्री बसराज बोम्मई यांनी स्पष्ट केले, की पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, राज्य प्रभारी अरुण सिंह आणि मी वैयक्तिकरित्या येडियुरप्पांना याबाबत सांगितले आहे. परंतु बीएसवायच्या सूत्रांनुसार विजयेंद्रला मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याची शक्यता आहे. कारण अजून 4 मंत्रालय शिल्लक आहेत. परंतु दिल्ली मुख्यालयकडून सांगितले जात आहे, की विजयेंद्रला मंत्रिमंडळात प्रवेश करता येणार नाही. कारण ते आमदारही नाही. शिवाय त्यांना दीर्घ अनुभवही नाही. म्हणूनच, विजयेंद्र यांना 2023 च्या निवडणुकीकरिता पक्ष बांधणीच्या कामांसाठी नियुक्त केले जाईल. जर विजयेंद्र यांनी पुढील निवडणुकीत जागा मिळवली, तर त्यांना मंत्रिमंडळात येण्याची संधी असेल. मात्र प्रश्न असा आहे की पूर्वीचे सुपर सीएम विजयेंद्र हे मान्य करतील का? किंवा ते पुढील राजकीय खेळणार? हे पाहणे महत्वाचे ठरणारे आहे.