पणजी: विधानसभा निवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.आज सावंत आणि पंतप्रधान मोदी यांची भेट होणार आहे. याचबरोबर मुख्यमंत्री सावंत गोवा भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे तसेच निवडणुक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे. गोव्यात आधीच काँग्रेस पक्षाचे केंद्रीय निरीक्षक पी चिदंबरम आणि दिनेश गुंडू राव दाखल झाले आहेत. त्यांनी गोव्यातील विधानसभा उमेदवारांसोबत बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. या बैठकीत आगामी सरकार स्थापन करण्याचा महत्वाच्या घडामोडीवर चर्चा सुरू आहे.
Goa Assembly Election : गोव्यात राजकीय घडामोडींना वेग, डाॅ. सावंत दिल्लीत तर चिदंबरम गोव्यात - डाॅ. प्रमोद सावंत दिल्लीत दाखल
गोवा विधानसभा निवडणुक (Goa Assembly Election) निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत भाजप (Chief Minister Dr. Pramod Sawant) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. आज सावंत आणि पंतप्रधान मोदी यांची भेट होणार आहे.तर दुसरीकडे काॅंग्रेसचे निरिक्षक पी. चिदंबरम (P. Chidambaram) गोव्यात दाखल झाले असुन ते उमेदवारांसोबत बैठका घेत आहेत.
![Goa Assembly Election : गोव्यात राजकीय घडामोडींना वेग, डाॅ. सावंत दिल्लीत तर चिदंबरम गोव्यात Dr. Sawant in Delhi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14669760-988-14669760-1646721144508.jpg)
डाॅ. सावंत दिल्लीत