महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 3, 2021, 4:02 PM IST

ETV Bharat / bharat

'धोरणाला पक्षाघात झालेले सरकार कोरोनाला हरवू शकत नाही'

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की धोरणाचा पक्षाघात झालेले सरकार कोरोनावर मात करू शकत नाही. त्याला सामोरे जा. ते खोटे ठरवू नका.

Rahul Gandhi
राहुल गांधी

नवी दिल्ली- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महामारीने उद्भवलेल्या परिस्थितीवरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्र सरकारला धोरणाचा पक्षाघात झाला आहे. त्यामुळे या सरकारला सुरक्षितपणे कोरोनावर विजय मिळविणे शक्य नसल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की धोरणाचा पक्षाघात झालेले सरकार कोरोनावर मात करू शकत नाही. त्याला सामोरे जा. ते खोटे ठरवू नका.

हेही वाचा-नागपुरात लसीचा तुटवडा; 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सोमवारी होऊ शकणार नाही

लशीच्या किमतीवरूनही राहुल गांधींची टीका-

यापूर्वीही काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी कोरोना लशींच्या किमतीवरून केंद्र सरकारवर टीका केली होती. कोरोना लस तयार करण्यासाठी सरकारी निधीचा वापर केंद्र सरकारने केला. आता, त्याच कंपन्यांकडून लोकांना जास्त दराने लस विकण्यात येत आहे. जगात कोरोनाची एवढी महागडी लस कुठेच नाही. पंतप्रधान मोदींचे नेतृत्वाखालील सरकार त्यांच्या मित्रांसाठी लोकांना लुटत असल्याचा आरोपही गांधी यांनी केला होता.

हेही वाचा-केकेआरच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण; कोलकाता-बंगळुरूचा सामना रद्द

महामारीच्या सत्यतेबाबत सरकारकडून नियंत्रण

रोजगार आणि विकासाप्रमाणे केंद्र सरकारने कोरोनाबाबतची खरी आकडेवारी लोकापर्यंत पोहोचू दिली नाही. त्यांना महामारी कदाचित नियंत्रणात आणणे शक्य होणार नाही. मात्र, महामारीच्या सत्यतेबाबत नियंत्रण करणे शक्य होईल, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, रविवारच्या आकडेवारीनुसार कोरोनाचे नवीन 3,68,147 रुग्ण आढळले आहेत. तर 3,417 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. अनेक शहरांमध्ये कोरोनाबाधितांना ऑक्सिजन, रुग्णालयात बेड व रेमडेसिवीर उपलब्ध नसणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details