नवी दिल्ली -सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांनी यू-ट्यूबर गौरव वासन यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. गौरवने मदत मिळालेल्या पैशात फेरफार केल्याचे प्रसाद यांनी सांगितले आहे. तक्रार दाखल केल्यानंतर प्राथमिक चौकशी करुन मालविया नगर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती डीसीपी अतुल ठाकुर यांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांनी बॅंकेचे व्यवहार तपासले ज्यात अधिक तपास करण्याची आवश्यकता आहे.
यू-ट्यूबर गौरव वासन विरोधात गुन्हा दाखल - यू-ट्यूबर गौरव वासन गुन्हा न्यूज
यू-ट्यूबर गौरव वासन विरोधात फसणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. बाबा के ढाबा चे मालक कांता प्रसाद यांनी गौरव विरोधात तक्रार दाखल केली आहे.
फसवणूकीचा गुन्हा
31 ऑक्टोबरला राहणारे बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांनी मालविया नगर पोलीस ठाण्यात यू-ट्यूबर गौरव वासनच्या विरोधात फसवणुक केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. तक्रारदार प्रसाद मालविया नगरमधील हनुमान मंदिराजवळ आपला ढाबा चालवतात. ऑक्टोबर 2020मध्ये गौरवने त्यांना मदत करण्यासाठी व स्वत:च्या जाहिरातीसाठी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रस्ताव मांडला. ठरल्याप्रमाणे व्हिडिओ तयार होऊन सोशल मीडियावर प्रसारित झाला. व्हिडिओच्या माध्यमातून प्रसाद यांना लॉकडाऊनच्या बिकट काळात आर्थिक मदत करण्याची विनंती गौरवने केली होती. मात्र गौरवने मदतीसाठी केवळ स्वत:च्या आणि परिवारातील सदस्यांच्या बॅंक खात्यांचे नंबर दिले होते. यानंतर मदत म्हणून आलेल्या रकमेत त्याने फेरफार केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.