हैदराबाद : हैदराबाद पोलिसांनी निवडणूक रणनीतीकार सुनील कानुगोलू (Congress poll strategist Sunil Kanugolu) यांच्या 'इनक्लुझिव माइंड्स' च्या कार्यालयावर छापा टाकल्यानंतर तेलंगणामध्ये राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. (Police raid on Sunil Kanugolu office). काँग्रेसने हे षडयंत्र असल्याचा आरोप करत, पोलिसांनी डेटा चोरल्याचा दावा केला आहे. खासदार आणि राज्य प्रभारी मणिकम टागोर यांनी या प्रकरणी संसदेत स्थगिती प्रस्ताव मांडला आहे. काँग्रेसच्या 2024 टास्क फोर्सचे प्रमुख सदस्य असलेले कोनागुलु हे तेलंगणा, कर्नाटक आणि इतर राज्य जेथे आगामी काळात निवडणुका होणार आहेत तेथे पक्षाच्या प्रचाराची रणनीती आखत आहेत. (Police raid on Congress poll strategist).
Police Raid On Sunil Kanugolu : कॉंग्रेसच्या निवडणूक रणनीतीकाराच्या कार्यालयावर पोलिसांचा छापा - कॉंग्रेसच्या निवडणूक रणनीतीकाराच्या कार्यालयावर
तेलंगणा पोलिसांनी सुनील कानुगोलू (Congress poll strategist Sunil Kanugolu) यांचे सायबराबाद येथील कार्यालय जप्त केले आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, त्यांच्या टीमद्वारे चालवल्या जाणार्या काही सोशल मीडिया पेजेसची चौकशी सुरू करण्यात आली होती. तेलंगणातील काँग्रेसच्या वॉर रूमला घेराव घातल्याने पक्षाने संताप व्यक्त केला आहे. (Police raid on Sunil Kanugolu office). (Police raid on Congress poll strategist).
तेलंगणा भवनात आंदोलन करणार : तेलंगणा पोलिसांनी सुनील कानुगोलू यांचे सायबराबाद येथील कार्यालय जप्त केले आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, त्यांच्या टीमद्वारे चालवल्या जाणार्या काही सोशल मीडिया पेजेसची चौकशी सुरू करण्यात आली होती. तेलंगणातील काँग्रेसच्या वॉर रूमला घेराव घातल्याने पक्षाने संताप व्यक्त केला आहे. माणिककम टागोर यांनी आज संसदेत वॉर रुमला घेराव घालत स्थगिती प्रस्ताव दिला. याशिवाय काँग्रेसचे खासदार रेवंत, उत्तम आणि इतर नेते दिल्लीतील तेलंगणा भवनात आंदोलन करणार आहेत. दुसरीकडे, पीसीसीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी या प्रकरणी राज्यभर आंदोलन पुकारले आहे.
कॉंग्रेस नेते नजरकैदेत : प्रदेश काँग्रेसने सुरू केलेल्या या आंदोलनांना पोलीस आडमुठेपणाने रोखत आहेत. पक्षाच्या प्रमुख नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. माजी मंत्री शब्बीर अली, माजी खासदार मल्लू रवी आणि इतर काही नेत्यांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन केले जात असतानाही काँग्रेस नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.