महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Police Medal Announced :  901 पोलिसांना पोलीस पदक जाहीर, महाराष्ट्रातील 84अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश

पीआयबी कडून मिळालेल्या माहितीनुसार, 140 शौर्य पुरस्कारांपैकी सर्वाधिक पुरस्कार अतिरेकी प्रभावित भागात कार्य करणाऱ्या 80 कर्मचार्‍यांना दिले जाणार आहेत. तर, जम्मू आणि काश्मीर प्रदेशात कार्यरत 45 जवानांना सन्मानित केल्या जाणार आहे. तर महाराष्ट्रातील 84 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.

Republic Day
901 पोलिसांना पोलीस पदक जाहीर

By

Published : Jan 25, 2023, 1:11 PM IST

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील विविध राज्यांतील एकूण ९०१ पोलिसांना पोलीस पदके प्रदान करण्यात आली आहेत. 140 जणांना शौर्य पोलीस पदक (PMG), 93 जणांना राष्ट्रपती पोलीस पदक (PPM) आणि 668 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक (PM) प्रदान करण्यात आले आहे. पीआयबी कडून मिळालेल्या माहितीनुसार, 40 शौर्य पुरस्कारांपैकी सर्वाधिक पुरस्कार अतिरेकी प्रभावित भागात कार्य करणाऱ्या 80 कर्मचार्‍यांना दिले जाणार आहेत. तर, जम्मू आणि काश्मीर प्रदेशात कार्यरत 45 जवानांना सन्मानित केल्या जाणार आहे.

पोलिसांना पोलीस पदक जाहीर

कुणा-कुणाला मिळणार पदक : पीआयबी कडून मिळालेल्या माहितीनुसार, 40 शौर्य पुरस्कारांपैकी सर्वाधिक पुरस्कार अतिरेकी प्रभावित भागात कार्य करणाऱ्या 80 कर्मचार्‍यांना दिले जाणार आहेत. तर, जम्मू आणि काश्मीर प्रदेशात कार्यरत 45 जवानांना सन्मानित केल्या जाणार आहे. शौर्य पुरस्कार विजेत्यांमध्ये सीआरपीएफचे 48, महाराष्ट्रातील 31, जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे 25, झारखंडचे 09, दिल्ली, छत्तीसगड आणि बीएसएफचे 07 आणि बाकीचे इतर राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश आणि सीएपीएफ मधील जवानांचा समावेश आहे.

पोलिसांना पोलीस पदक जाहीर

कर्तव्यनिष्ठेसाठी पोलीस पदक : शौर्यासाठी पोलीस पदक (PMG) जीवन आणि मालमत्ता वाचवण्यासाठी किंवा गुन्हेगारी रोखण्यासाठी किंवा गुन्हेगारांना अटक करण्यासाठी विशिष्ट शौर्याच्या आधारावर प्रदान केले जाते. पोलीस सेवेतील विशिष्ट विक्रमासाठी राष्ट्रपती पोलीस पदक (PPM) दिले जाते. आणि कर्तव्यनिष्ठेसाठी पोलीस पदक (PM) सन्मानित केले जाते.

पोलिसांना पोलीस पदक जाहीर

महाराष्ट्राला एकूण 84 राष्ट्रपती पदके : महाराष्ट्र राज्यातील एकूण ८४ पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली. यापैकी ४२ जणांना राष्ट्रपती शौर्य पदक, तिघांना विशेष सेवेसाठी आणि ३९ जणांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी सन्मानीत करण्यात येणार आहे. राज्यातील तीन अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात येणार आहे. राज्य गुप्तवार्ता विभागातील पोलीस मुख्यालयालयातील सहआयुक्त सुनील कोल्हे, ओशिवारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर धनावडे, ठाणे येथील वायरलेस विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप कन्नाळू यांचा त्यात समावेश आहे.

राष्ट्रपती शौर्य पदकप्राप्त अधिकारी-कर्मचारी : राष्ट्रपती शौर्य पदकांपैकी ३६ पदके गडचिरोली येथे कार्यरत असलेल्या आणि मरणोत्तर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाहीर झाले आहेत. तर, किशोर आत्राम (पोलीस शिपाई, गडचिरोली), जगदेव मडावी (पोलीस हवालदार, गडचिरोली), आणि धनाजी होनमाने (पोलीस उपनिरीक्षक, गडचिरोली) या तिघांना मरणोत्तर राष्ट्रपती शौर्य पदक देण्यात येणार आहे. तसेच गुणवत्तापूर्वक सेवेसाठी देखील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details