महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

UP Crime News : भुतांचा छडा लावणारा पोलीस अधिकारीच निघाला दरोडेखोर, गुजराती व्यावसायिकांकडून उकाळले 1.4 कोटी; 7 पोलीस कर्मचारी निलंबित

उत्तरप्रदेश सरकारने वाराणसी जिल्ह्यातील भेलुपूर भागातील एका पोलीस अधिकऱ्यासह 7 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यांच्यावर एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्याला लुटल्याचा आरोप होता.

युपी पोलिसांनी  व्यावसायिकांकडून उकाळले 1.4 कोटी रुपये
युपी पोलिसांनी व्यावसायिकांकडून उकाळले 1.4 कोटी रुपये

By

Published : Jun 12, 2023, 10:46 AM IST

वाराणसी : उत्तरप्रदेश पोलिसांचा प्रकार पाहून तुमचा-आमचा पोलिसांवर विश्वास राहणार नाही. हो, अगदी खरं, तुम्ही वाचले ते बरोबर वाचले आहे. युपीमधील भुताचा छडा लावणारा पोलीस अधिकारीच भामटा निघाल्याने नागरिकांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. दरम्यान याप्रकरणी उत्तरप्रदेश सरकारने वाराणसी जिल्ह्यातील भेलुपूर भागातील एका पोलीस अधिकऱ्यासह 7 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांनी भेलुपूर भागातील गुजरातमधील एका व्यावसायिकांकडून 1.4 कोटी रुपये उकाळले होते.

अशी आहेत आरोपी पोलिसांची नावे : बडतर्फ करण्यात आलेल्या पोलिसांवर औरैया जिल्ह्यातील बांदा येथील एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्याला लुटल्याचा आरोप होता. बडतर्फ करण्यात आलेल्या पोलिसांमध्ये एक (स्टेशन हाऊस ऑफिसर SHO) पोलीस निरीक्षक, 3 उपनिरीक्षक आणि 3 कॉन्स्टेबलचा समावेश आहे. रमाकांत दुबे असे पोलीस अधिकारीचे नाव आहे. तर सुशील कुमार, महेश कुमार आणि उत्कर्ष चतुर्वेदी अशी उपनिरीक्षकांची नावे आहेत. महेंद्र कुमार पटेल, कपिल देव पांडे आणि शिवचंद हे कॉन्स्टेबल आहेत. या सर्वांना सशस्त्र लूट केल्याच्या आरोपाखाली बडतर्फ करण्यात आले आहे. हे सर्व वाराणसी जिल्ह्यातील भेलुपूर पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

पोलीस कर्मचाऱयांवर कारवाई : याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, 1.4 कोटी रुपयांच्या दरोड्याच्या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. याप्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर 7 पोलीस कर्मचाऱ्यांवर बडतर्फाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उच्चपदस्थांच्या म्हणण्यानुसार, बडतर्फ केलेल्या पोलिसांना सुरुवातीला निष्काळजीपणासाठी निलंबित करण्यात आले होते. या घटनेच्या प्राथमिक तपासात पोलिसांचा या दरोड्यात सक्रिय सहभाग असल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले. दरोड्यात सहभागी असलेल्या पोलिसांवरही फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

पोलिसांना असा मिळाला होता पैसा :मिळालेल्या माहितीनुसार, 31 मे रोजी वाराणसी पोलिसांनी म्हणजे या बडतर्फ पोलिसांनी कारमधून 92.94 लाख रुपये जप्त केली होती. या पोलिसांना भेलूपूर परिसरात ही बेवारसपणे पडलेली दिसून आली होती. त्या कारची तपासणी केल्यानंतर आपल्याला कारमधून 92.94 लाख रुपये मिळाल्याची माहिती या बडतर्फ पोलिसांनी वरिष्ठांना दिली होती. परंतु काही दिवसानंतर हा पैसा गुजरातमधील एका व्यावसायिकाचा होता हे उघड झाले होते. या व्यावसायिकाला पोलिसांनी धमकावून ही खंडणी वसूल केली होती. पोलिसांचा गुन्हा उघड होण्याआधी पीडित व्यावसायिकाने पैसे लुटल्या गेल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. सप्टेंबर 2022 च्या सुरुवातीला सोशल मीडियावर भुताचे अनेक व्हिडिओ जिल्हाभरात व्हायरल झाले होते. घराच्या छतावरती पांढरी वस्तू फिरत होती, ही वस्तू भूत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावरुन पोलिसांनी अज्ञातांविरुद्धात गुन्हा दाखल केला होता. दुबे या प्रकरणाचा तपास करत होते.

पोलिसांचा असा झाला पदार्फाश :दरम्यान ज्या व्यावसायिकाने सशस्त्र दरोड्याची तक्रार केली होती, त्याचा तपास पोलीस करत होते. विशेष म्हणजे या लुटमारीचा तपास तेच पोलीस कर्माचारी करत होते, जे स्वत: त्या गुन्हात सहभागी होते. पोलिसांनी काही दिवसांपूर्वी आपल्या वरिष्ठांना कारमध्ये रक्कम मिळाल्याचे सांगितले होते. परंतु ही रक्कम त्याच गुजरात व्यावसायिकाची होती. पोलिसांनी त्या व्यावसायिकाला धमकावून त्यांच्याकडून 92 लाख 94 कोटी रुपये उकाळले होते. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाला त्याचा हिस्सा देण्यात आला. परंतु दरोड्यात सहभागी झालेल्या पोलिसांपैकी एक जण त्याला मिळालेल्या पैशावर नाराज होता. त्यानंतर त्याने या दरोड्याची सर्व कहाणी सर्वांसमोर आणली. गुजरातच्या व्यावसायिकाची लुटमार करण्यात पोलिसांचा सक्रिय सहभाग होता. ही माहिती समोर येताच सर्व तपासाचे चक्र फिरले आणि पोलिसांचा या चोरीत सहभाग असल्याचे समोर आले. त्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा -

  1. Thane Crime News : 'मोबाईल जिहाद' मास्टर माईंड शाहनवाज पोलिसांच्या जाळ्यात, अलिबाग येथून अटक
  2. Rape Of Two Minor Girls : अनाथ मुलींना दत्तक घेऊन ६ वर्षे अत्याचार, अनोळखी व्यक्तीच्या तक्रारीनंतर चाईल्डलाईनकडून सुटका

ABOUT THE AUTHOR

...view details