महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बीजापूर चकमक : हुतात्मा जवानांची संख्या २२ वर, राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या शोकसंवेदना - बीजापूर चकमक अपडेट

बीजापूर चकमक
बीजापूर चकमक

By

Published : Apr 4, 2021, 2:57 PM IST

Updated : Apr 4, 2021, 6:33 PM IST

16:59 April 04

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी शोक व्यक्त केला.

14:53 April 04

नक्षल ऑपरेशन डीजी अशोक जुनेजा

14:50 April 04

मार्च 2014 ते मे 2020 नक्षलवादी हल्ल्याची आकडेवारी

14:45 April 04

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला

14:45 April 04

बीजापूरमधील चकमकीत हुतात्मा झालेल्या जवानांप्रती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. संपूर्ण देश या जवानांच्या कुटुंबीयांसोबत उभा असून, त्यांचे बलिदान कधीच विसरले जाणार नसल्याचे ते म्हणाले.

जवानांना वाहिली आदरांजली

14:45 April 04

नक्षलवाद्यांचेही मोठे नुकसान झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

हुतात्मा बबलू रब्बाला सलामी

14:45 April 04

अमित शाह दिल्लीला रवाना

रुग्णालयामध्ये नातेवाकांची धाव

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आपला आसाममधील दौरा थांबवत दिल्लीला रवाना झाले आहेत. याठिकाणी ते वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत छत्तीसगडमधील चकमकीबाबत चर्चा करतील, आणि परिस्थितीचा आढावा घेतील.

14:34 April 04

बीजापूर चकमक : हुतात्मा जवानांची संख्या २२ वर, राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या शोकसंवेदना

मुख्यमंत्री भूपेश बघेल चकमकीबाबत माहिती देताना..

रायपूर - छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नलक्षलवाद्यांमध्ये शनिवारी मोठी चकमक झाली होती. यात सीआरपीएफचे पाच जवान हुतात्मा झाल्याची माहिती समोर आली होती. तर आज बीजापूरमधील चकमकीत हुतात्मा झालेल्या जवानांची संख्या 22 वर पोहचली आहे.  

एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंह हे छत्तीसगडमध्ये पोहोचले होते. या चकमकीत एका महिला नक्षलवाद्यासह दोन नक्षलवादी ठार झाले होते. एका नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला आहे.  

गेल्या दहा दिवसांपासून सुरक्षा दलांना माद्वी हिदमा या कुख्यात नक्षलवाद्याबाबत माहिती मिळत होती. त्याला पकडण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. 2013 मध्ये झालेल्या झीराम घाटी हत्याकांडात या नक्षलवाद्याचा हात होता. या हत्याकांडामध्ये छत्तीसगड काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांसह सुमारे 30 लोकांची हत्या करण्यात आली होती.

Last Updated : Apr 4, 2021, 6:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details