सेलम ( तामिळनाडू ) :युट्युबवर व्हिडीओ पाहून येथील दोन तरुणांनी या बंदुका, ग्रेनेड आणि धारदार चाकू तयार ( Made weapons by watching YouTube ) केले. पोलीस रस्त्यावर झडती घेत असताना हे तरुण त्यांना दिसले. झडती घेतल्यावर त्यांच्याकडे हत्यारे मिळून आली. चौकशी केली असता युट्युबवर व्हिडीओ पाहून ही हत्यारे तयार केल्याचा प्रकार उघडकीस ( Youth arrested for made illegal gun ) आला.
ओमालूरजवळील पुलीयमपट्टी येथे ओमालूर पोलीस वाहनाची झडती घेत होते. त्यानंतर सालेम येथून दुचाकीवरून दोन तरुण आले. त्यांना ताब्यात घेतलेल्या पोलिसांनी त्यांची चौकशी केली. त्यांनी उलटसुलट उत्तर दिले. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगची झडती घेतली. त्यात एक पिस्तूल, एक मोठी पिस्तूल, अर्ध्या स्थितीत बनवलेले मोठे पिस्तूल, चाकू अशी हत्यारे असल्याचे समोर आले.पोलिसांनी तत्काळ दोघांना अटक करून पुढील तपासासाठी पोलीस ठाण्यात नेले.