हैदराबाद : मृत्यू कोणत्या स्वरूपात येईल हे सांगणे अत्यंत कठीण आहे. एखादी व्यक्ती तरुण असो वा वृद्ध, निरोगी असो वा आजारी, तिला मरण हे अटळ आहे. या आधुनिक जीवनात बदलत्या सवयींसह माणसाला ६० वर्षे जगणेही अवघड होत चालले आहे. कोरोना आल्यापासून हृदयाच्या समस्या वाढल्या आहेत. कोविड दरम्यान आरोग्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अनेकांना विविध व्यायाम करण्याची सवय लागली आहे. काही वेळा व्यायाम करताना काही लोक क्षणात कोसळतात आणि मरतात. अलीकडेच हैदराबादमधील एका हवालदारालाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला.
व्यायाम करताना कोसळला : हैदराबादमध्ये व्यायाम करत असताना कॉन्स्टेबल विशालचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याच्या मित्रांनी कितीही प्रयत्न केले तरी ते त्याला वाचवू शकले नाहीत. हृदयविकाराच्या झटक्याने विशाल कोसळल्याचे दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिकंदराबादमधील गौस मंडी भागातील विशाल (२४) हा 2020 पासून आसिफ नगरमध्ये हवालदार म्हणून कार्यरत आहे. नेहमीप्रमाणे काल संध्याकाळी तो आपली ड्यूटी संपवून घरी गेला. घरी गेल्यानंतर तो फ्रेश होऊन व्यायाम करण्यासाठी जिममध्ये गेला. जिममध्ये त्याने त्याच्या मित्रांसोबत थोडावेळ हँग आउट केले आणि नंतर तो वर्कआउट करायला लागला. मात्र व्यायाम करता करताच तो काही सेकंदातच कोसळला.
रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू : विशाल अचानक कोसळल्याचे पाहून त्याचे सहकारी तातडीने विशालकडे आले. मात्र त्यापूर्वीच विशालचे निधन झाले होते. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा आधीच मृत्यू झाल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने विशाल कोसळल्याची दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशाप्रकारे अचानक येणारा हृदयविकाराचा झटका लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांच्या मृत्यूचे कारण ठरतो आहे.
भटक्या कुत्र्यांपासून काळजी घ्या! : हैदराबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांची मोठी दहशत पहायला मिळते आहे. शहरात भटक्या कुत्र्यांच्या विविध हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहे. यात लहान मुलांसह मोठ्यांचाही समावेश आहे. कुत्र्यांच्या हल्यात काही चिमुकल्यांना आपला जीवही गमवावा लागला आहे. तर यातील कहींवर रूग्णालयात उपचार घेण्याची वेळ देखील आली आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांबाबत अनेक वेळा तक्रार करूनही पालिकेने यावर कुठलीही कारवाई केली नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी कुत्र्याच्या अशाच एका हल्ल्यात एक विद्यार्थी जखमी झाला होता. आणखी एका घटनेत भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केल्याने एक वृद्ध गंभीर जखमी झाला होता. वीणावांका मंडळ मल्लारेड्डीपल्ली येथे एक व्यक्ती दुचाकीवरून जात असताना कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला. यामुळे तो व्यक्ती दुचाकीवरून खाली पडून गंभीर जखमी झाला.
हेही वाचा :Stray Dog Attack : काळजी घ्या! हैदराबादमध्ये भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढले; वेगवेगळ्या घटनांमध्ये सात जखमी