जयपूर- भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी राजस्थानमधील करौली येथे न्याय यात्रा ( BJP Nyay Yatra in karauli ) काढली आहे. ही रॅली करौलीतील हिंसाचाराच्या विरोधात काढण्यात आली आहे. तेजस्वी सुर्या हे करौली येथील हिंसाचार घटनेतील पीडितांना भेटण्यासाठी पोहोचले. करौली येथे जाणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष डॉ. सतीश पुनिया आणि युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या ( tejasvi Surya visits karauli ) यांना पोलिसांनी हिंडौन रस्त्यावरून करौलीकडे जाण्यापासून रोखले.
भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्यासह भाजपच्या नेत्यांनी रस्त्यावरच धरणे आंदोलन ( Nyay Yatra Of BJYM ) सुरू केले. पोलीस प्रशासन हे भाजप नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर जोपर्यंत आम्हाला करौलीला जाऊ दिले जात नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका तेजस्वी यादव यांनी ( Tejasvi Surya protest In Rajasthan ) घेतली आहे. एक तर करौलीला जाऊ अन्यथा तुरुंगात जाऊ, असा इशारा त्यांनी दिला.
गेहलोत सरकार म्हणजे लालुंची जंगली राजवट- भाजपच्या न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक टप्प्यावर प्रशासनाने पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. जिल्ह्यातील बहुतांश सीमा सील करण्यात आल्या आहेत. मासलपूर जकात नाक्यावरही मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या वाहनांचा प्रवेश थांबविण्यात आला आहे. तत्पूर्वी, सूर्या यांनी जयपूरमधील हिंसाचारात जखमी झालेल्या तरुणांशी एसएमएस हॉस्पिटलमध्ये संवाद साधला. रुग्णालयाच्या बाहेर येऊन राज्याच्या गेहलोत सरकारवर जोरदार हल्ला चढविला. गेहलोत सरकार हे लालू प्रसाद यादव यांच्या जंगली राजवटी सारखी असल्याची त्यांनी टीका केली.
सरकारने हिरावले घटनात्मक अधिकार-तेजस्वी सूर्या म्हणाले की, या हुकूमशाही सरकारने आम्हाला रोखले आहे. सध्या येथे कलम 144 लागू नाही. मात्र त्यानंतरही पोलीस प्रशासनाने रोखले आहे. गेहलोत सरकार आमचे घटनात्मक अधिकार हिरावून घेत आहे. राजस्थानमध्ये प्रशासनाने हिंसाचारग्रस्त करौली जिल्ह्याला भेट देण्यास परवानगी नाकारल्यानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि त्यांच्या सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत निषेध केला.