महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Russian Buddhist Monk Arrested : देवीच्या तंत्र साधनेसाठी मंदिरात नेली 10 मिली दारू, रशियन बौद्ध भिक्खूला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - इडिप्सी अयास

बोधगया येथील महाबोधी मंदिरात (Mahabodhi Temple At Bodh Gaya) तारा देवीची तंत्र साधना करण्यासाठी रशियन बौद्ध भिख्खूला दारू नेताना पोलिसांनी पकडले. मंदिरातील सुरक्षा रक्षकांनी तपासणीत ही दारू पकडल्याने घटना उघड झाली. त्यामुळे 10 मीली दारूसाठी रशियन बौद्ध भिख्खूला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याची रवानगी तरुंगात केल्याची माहिती गया पोलिसांनी दिली.

Russian Buddhist Monk Arrested
बोधगया पोलीस ठाणे

By

Published : Jan 20, 2023, 9:06 PM IST

गया -बिहारमधील बोधगया येथील महाबोधी मंदिरात आलेल्या एका रशियन बौद्ध भिक्खूला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडे 10 मिली दारू मिळाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. रशियन बौद्ध भिक्खू ही दारू तारा देवीच्या तंत्र साधनेसाठी मंदिरात नेत होता. मात्र मंदिरात प्रवेश करतानाच त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अटक केली. इडिप्सी अयास असे त्या तंत्र साधनेसाठी मंदिरात दारू नेणाऱ्या बौद्ध भिक्खूचे नाव असल्याची माहिती बोधगया पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली.

महाबोधी मंदिरात प्रवेश करताना केले अटक :रशियन बौद्ध भिख्खू इडिप्सी अयास याला बोधगया मंदिरात तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अटक केली. बोधगया येथील महाबोधी मंदिरात प्रवेश करताना तपासादरम्यान त्याच्याकडे 10 मिली दारू आढळून आली. बिहारमध्ये दारू बंदी आहे. मात्र तरीही दारू मिळवून ती मंदिरात तंत्र साधनेसाठी घेऊन जात असल्याने या भिख्खूला अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर रशियन बौद्ध भिख्खू इडिप्सी अयासला तरुंगात पाठवण्यात आले.

तारा देवीच्या मंदिरात तंत्र साधनेसाठी नेत होता दारू :बौद्ध भिख्खू इडिप्सी अयास हा तंत्र साधनेसाठी महाबोधी मंदिरात प्रवेश करत होता. त्याने तंत्र साधनेसाठी 10 मिली दारू सोबत ठेवली होती. ही दारू तो तारा देवीच्या विशेष तंत्र साधनेच्या पूजेसाठी वापरणार होता. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी रशियन बौद्ध भिख्खू अयास विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

बोधगया पोलिसांकडून कसून चौकशी :रशियन बौद्ध भिख्खू इडिप्सी अयास हा तंत्र साधनेसाठी मंदिरात दारू घेऊन जात असल्याचे उघड झाल्याने गयात खळबळ उडाली. बौद्ध भिख्खू इडिप्सी हा तारा देवीच्या मंदिरात ही दारू तंत्र साधनेसाठी नेत होता. त्यामुळे अशाच प्रकारची तंत्र साधना या मंदिरात अगोदरही कऱण्यात येत होती काय, याचा पोलीस तपास करत आहेत. याबाबत बोधगया पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रुपेश कुमार सिन्हा यांनी रशियन बौद्ध भिख्खू इडिप्सी अयास हा तंत्र साधनेसाठी 10 मिली दारू मंदिरात घेऊन जात होता. मात्र मंदिरात प्रवेश करताना त्याला अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्याला तरुंगात पाठवल्याचेही सिन्हा यावेळी म्हणाले.

हेही वाचा - Ahmedabad Crime: पतीने पत्नीचा गळा चिरुन घराला लावली आग, अहमदाबादच्या गोदरेज गार्डन परिसरात दहशत

ABOUT THE AUTHOR

...view details