महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मोदींकडून 9.75 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 19,500 कोटी जमा, किसान सन्मान निधीचा नववा हफ्ता मिळाला - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी देशातील 9.75 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान सन्मान निधीचा नववा हफ्ता जमा केला. आभासी पद्धतीने देशभरातील 9.75 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 19500 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

मोदींकडून किसान सन्मान निधीचा नववा हफ्ता 9.75 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
मोदींकडून किसान सन्मान निधीचा नववा हफ्ता 9.75 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

By

Published : Aug 9, 2021, 2:04 PM IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी देशातील 9.75 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान सन्मान निधीचा नववा हफ्ता जमा केला. आभासी पद्धतीने देशभरातील 9.75 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 19500 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

किसान सन्मान निधीअंतर्गत 1.57 लाख कोटी वितरीत

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 1.57 लाख कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. किसान सन्मान निधीची रक्कम जमा केल्यानंतर पंतप्रधानांनी लाभार्थी शेतकऱ्यांशी संवादही साधला. फेब्रुवारी 2019 मधील अर्थसंकल्पात किसान सन्मान निधी योजनेची घोषणा करण्यात आली होती. यानंतर मार्च 2019 मध्ये योजनेचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.

किसान सन्मान निधीचा नववा हफ्ता जमा जमा करण्यापूर्वी या योजनेअंतर्गत देशातील सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांना 1.37 लाख कोटी रुपये वितरीत करण्यात आले होते अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली.

हेही वाचा -एखाद्या समाजाला मागास ठरविण्याचे अधिकार राज्यांना द्या; फडणवीसांची अमित शहांना विनंती

ABOUT THE AUTHOR

...view details