महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ऑक्सिजन उपलब्धतेवर पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक - ऑक्सिजन कमतरता

आज शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील वैद्यकीय ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर उच्चस्तरीय आढावा बैठक घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

By

Published : Jul 9, 2021, 2:06 PM IST

नवी दिल्ली - देशात कोरोनाची लहर असून सध्या रुग्ण संख्येत घट होत असल्याचे दिसत आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार झाला होता. तेव्हा ऑक्सिजन कमतरता निर्माण झाली होती. आता पुन्हा शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील वैद्यकीय ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर उच्चस्तरीय आढावा बैठक घेणार आहेत.

देशात कोरोनाच्या तिसरी लाट आल्यानंतर आरोग्य व्यवस्था ढासाळून जाऊ नये आणि ऑक्सिजनची पूर्तता व्हावी, या उद्देशाने ही बैठक घेण्यात येत असल्याची माहिती आहे. यापूर्वी 2 जून रोजी मोदींनी देशातील सर्वोच्च नेत्यांसमवेत कोरोना लसीकरण अभियान आणि कोरोना संक्रमणासंदर्भात चर्चा केली होती.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक रुग्ण दगावले होते. देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला होता. कोविड रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने ऑक्सिजन रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला होता. विशाखापट्टणम, जमशेदपूर, राउरकेला, बोकारो येथून ऑक्सिजन आणण्यासाठी रेल्वेचा वापर करण्यात आला होता.

देशातील कोरोना रुग्णांची स्थिती...

  • एकूण रुग्ण : 3,07,52,950
  • कोरोनामुक्त रुग्ण : 2,98,88,284
  • सक्रीय रुग्ण संख्या : 4,58,727
  • एकूण मृत्यू : 4,05,939
  • एकूण लसीकरण : 36,89,91,222

हेही वाचा -तामिळनाडू : ऑक्सिजनअभावी ११ रुग्ण दगावले; चेंगलपट्टू रुग्णालयातील घटना

हेही वाचा -मुंबई - बेकायदेशीर ऑक्सिजन सिलेंडरचा साठा; 6 लाख 86 हजारांच्या मुद्देमालासह दोन जणांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details