महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदी घेणार केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक; कोरोना परिस्थितीबाबत करणार चर्चा - पंतप्रधान मोदी मंत्रीमंडळ बैठक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा बसल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक बौलावण्यात आली आहे. यापूर्वी पंतप्रधानांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेच्या काही फेऱ्या घेतल्या आहेत.

PM to chair council of ministers meeting, likely to discuss Covid situation
पंतप्रधान मोदी घेणार केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक; कोरोना परिस्थितीबाबत करणार चर्चा

By

Published : Apr 30, 2021, 9:33 AM IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक बोलावली आहे. देशातील कोरोना परिस्थितीबाबत या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. आज (शुक्रवार) सकाळी ही व्हर्चुअल बैठक पार पडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा बसल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक बौलावण्यात आली आहे. यापूर्वी पंतप्रधानांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेच्या काही फेऱ्या घेतल्या आहेत.

यासोबतच, पंतप्रधानांनी आतापर्यंत उच्चस्तरीय सरकारी अधिकारी, फार्मा कंपन्यांचे अधिकारी, ऑक्सिजन पुरवठादार, तीनही सैन्यदलांचे प्रमुख तसेच इतर पदाधिकाऱ्यांसोबत बैठकी घेतल्या आहेत.

हेही वाचा :World With India : अमेरिकेहून पाठवलेले वैद्यकीय साहित्य देशात दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details