वॉशिंगटन :भारताकडून G-20 गटाचे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल मिळालेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी रविवारी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन ( French President Emmanuel Macron )यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांचे आभार मानले. तसेच जागतिक स्तरावर एकत्र काम करण्याचे आवाहन केले.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन ( Joe Biden ) यांच्या ट्विटला उत्तर देताना मोदी म्हणाले, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे आभार. तुमचा बहुमोल पाठिंबा भारताच्या G20 अध्यक्षपदासाठी बळ देणारा ठरेल. आपण सर्वांनी मिळून एक चांगली पृथ्वी निर्माण करणे महत्त्वाचे आहे.( Pm Thanks Several world leaders )
बायडेन यांनी अभिनंदन केले :शुक्रवारी आपल्या ट्विटमध्ये बायडेन ( Joe Biden ) म्हणाले होते की भारत हा अमेरिकेचा मजबूत भागीदार आहे आणि भारताच्या G-20 अध्यक्षपदाच्या काळात ते त्यांचे 'मित्र' पंतप्रधान मोदींना पाठिंबा देण्यास उत्सुक आहेत.
युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षांना काय म्हणाले : पंतप्रधान मोदींनी युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांचे शुभेच्छांसाठी आभार मानले. पंतप्रधानांनी ट्विट केले, 'धन्यवाद चार्ल्स मिशेल. आम्ही एकत्रितपणे जागतिक हितासाठी कार्य करत असताना तुमच्या सक्रिय सहभागाची अपेक्षा आहे. मिशेल यांनी G-20 चे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल भारताचे अभिनंदन केले.