नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांचे लोकसभा अध्यक्ष म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले. ओम बिर्ला यांनी गेल्या दोन वर्षात संसदीय लोकशाहीला समृद्ध करणाऱ्या उपाययोजनाची सुरूवात केली. त्यामुळे अनेक ऐतिहासिक तसेच लोकाभिमुख विधेयके मंजूर झाली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण; मोदींकडून कौतूक - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मोदींकडून कौतूक
ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्ष म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टि्वटनंतर ओम बिर्ला यांनी मोदींचे आभार मानले. सन्माननीय सदस्यांच्या सहकार्याने यशस्वी प्रयोग करू शकलो. ज्यामुळे सदस्यांची क्षमता आणि लोकशाहीच्या मंदिराची प्रतिष्ठा वाढली, असे टि्वट ओम बिर्ला यांनी केले.
ओम बिर्ला यांनी पहिल्यांदा खासदार झालेले युवा खासदार आणि महिला खासदारांना सभागृहात बोलण्याची संधी देण्यावर विशेष भर दिला आहे. लोकशाहीमध्ये महत्वाची भूमिका असलेल्या विविध समित्यांना त्यांनी बळकट केले आहे, असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टि्वटनंतर ओम बिर्ला यांनी मोदींचे आभार मानले. सन्माननीय सदस्यांच्या सहकार्याने यशस्वी प्रयोग करू शकलो. ज्यामुळे सदस्यांची क्षमता आणि लोकशाहीच्या मंदिराची प्रतिष्ठा वाढली, असे टि्वट ओम बिर्ला यांनी केले.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, संसदेच्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून ही दोन वर्षे ऐतिहासिक आणि फलदायी ठरली आहेत. संसदेतील कामगिरीच्या दृष्टिकोनातून सर्व सदस्यांच्या सक्रिय योगदानाने सभागृहात अर्थपूर्ण चर्चा, संवाद साधण्याचा प्रयत्न केला, जेणेकरुन घेतलेल्या निर्णयाचा समाजाला फायदा होईल. मतभेद झाल्यास सभागृहात घोषणा देण्याची परंपरा आहे, असा संसद सदस्यांचा मत होते. अशा परंपरा चांगल्या नसल्याचे मी त्यांना नम्रपणे सांगितले. लोकशाहीत विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या मतांचा आदर केला. सभागृहात एक सभासद असलेल्या पक्षालाही पुरेसा वेळ मिळेल, असा माझा प्रयत्न राहिला. लोकशाहीमधील निर्णय बहुमताच्या आधारे नव्हे तर व्यापक सहमतीच्या आधारे घेतले गेले पाहिजेत, असे बिर्ला म्हणाले.