नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत ( PM Narendra Modis interview ) आज रात्री 8 वाजता प्रसारित होणार आहे. ही मुलाखत एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश ( ANIs Smita Prakash interview of PM Modi ) घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुलाखतीत विधानसभा निवडणूक 2022 सह ( Goa Assembly Election ) विविध विषयांवर बोलणार आहेत. ही मुलाखत सुमारे 70 मिनिटांची ( 70 Minutes interview of Narendra Modi ) असणार आहे. ही मुलाखत ईटीव्ही भारतवरदेखील पाहता येणार आहे.
हेही वाचा-Devendra Fadnavis Critics on Sanjay Raut : संजय राऊत रोज सकाळी आमचे मनोरंजन करतात - फडणवीस
नुकतेच पंतप्रधान मोदींनी केले होते वादग्रस्त वक्तव्य-
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पत्रकार परिषद घेण्याचे टाळतात, असा विरोधकांकडून नेहमीच आरोप होतो. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत प्रसारित होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसमुळे कोरोना देशात पसरल्याची टीका पंतप्रधान मोदींनी संसदेत केली होती. त्यावर महाराष्ट्रात काँग्रेसने अनेक जिल्ह्यात निदर्शने केली आहेत. तसेच महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकादेखील केली आहे.
हेही वाचा-Amit Shah Campaign in Goa : गोव्यात रणधुमाळी; केंद्रीय गृहमंत्र्यांकडून भाजपचा घरोघरी प्रचार सुरू
दरम्यान,गोवा, मणिपुर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी तब्बल 690 जागांसाठी मतदान पार पडणार आहे.