नवी दिल्ली - संपूर्ण जगाला कोरोनाच्या सावटाखाली 2020 हे वर्ष काढावं लागलं. सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत 2021 नवीन वर्षाच स्वागत देशवासियांनी केलं आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कविता लिहली आहे. 'अभी तो सूरज उगा हैं' असे त्यांच्या कवितेचे शिर्षक आहे.
कोरोना महामारीमुळे देशवासियांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांनी या संकटात आपल्या प्रिय व्यक्ती गमावल्या. तसेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले. मोदींनी आपल्या कवितेच्या माध्यमातून नागरिकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी संकल्प आणि नव्या उर्जेसह देशवासियांना प्रगती करण्याचा संदेश दिला आहे. नरेंद्र मोदी यांनी हिंदी भाषेत ही कविता लिहिली आहे. MyGovIndia या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पंतप्रधान मोदींची कविता शेअर करण्यात आली आहे.