महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Ashadhi Ekadashi 2023 : 'जय हरी विठ्ठल' म्हणत पंतप्रधानांनी आषाढी एकादशीच्या दिल्या मराठीत शुभेच्छा - आषाढी एकादशीच्या मोदींकडून मराठीत शुभेच्छा

देशभरात आज बकरी ईद आणि आपल्या महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमध्ये आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. जय हरी विठ्ठल म्हणत पंतप्रधान मोदींनी मराठीत ट्विट केले आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jun 29, 2023, 1:09 PM IST

नवी दिल्ली -आज महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्सव सुरू आहे. लाखो वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी हजारो किलोमीटरचा टप्पा चालत पंढरपुरात दाखल झाले आहेत. तसेच राज्यभरातही आषढी एकादशीनिमित्ताने उत्साहाचे वातावरण आहे. आषाढी एकादशीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सर्वांना मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मराठीत शुभेच्छा -सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. हा शुभ दिवस आपल्याला वारकरी परंपरेला अनुसरुन भक्ती, नम्रता आणि करुणा हे भाव अंगीकारण्याची प्रेरणा देवो. भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने, सुखी, शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला नेहमी एकत्र काम करता येऊ दे. जय हरी विठ्ठल!

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अखंड विठुनामाच्या गजरात पंढरपुरात शासकीय महापूजा पार पडली. बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, त्याच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे, पाऊस पडू दे, राज्य सुजलाम, सुफलाम होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी -समाधानी होऊ दे. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आषाढी एकादशीच्या मुख्य शासकीय महापूजेवेळी विठूरायाच्या चरणी घातले.

काळे दाम्पत्य मानाचे वारकरी - चंद्रभागेच्या काठी आज देवशयनी एकादशीचा म्हणजे आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. आज पहाटे 3 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर नगर जिल्ह्यातील काळे दाम्पत्य मानाचे वारकरी ठरले आहेत.

विठुरायाची नगरी दुमदुमली : विठ्ठल नामाच्या जयघोषाने विठुरायाची नगरी दुमदुमली आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त मोठी गर्दी झाली आहे. दहा ते बारा लाख भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातूनही विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. आषाढी एकादशीनिमित्त चंद्रभागा नदीमध्ये पाणी सोडल्याने चंद्रभागेमध्ये स्नान करून भाविक नामदेव पायरीचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा पूर्ण करत आहेत.

हेही वाचा -

  1. Ashadhi Ekadashi 2023: बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, राज्य सुजलाम-सुफलाम होऊ दे- मुख्यमंत्र्यांचे विठूरायाला साकडे
  2. Ashadhi Wari 2023 : चंद्रभागेच्या तिरी लाखो भाविकांची गर्दी, भाविकांच्या गर्दीने फुलली विठ्ठू नगरी
  3. Ashadhi Ekadashi 2023: 27 वर्षाच्या वारीचे सार्थक झाले, मुख्यमंत्र्यांसोबत पूजेचा मान मिळालेल्या वारकरी कुटुंबाच्या भावना अनावर

ABOUT THE AUTHOR

...view details