महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोना स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची रात्री 8 वाजता महत्त्वाची बैठक - पंतप्रधान नरेंद्र मोदींची आढावा बैठक

कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत विविध मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

By

Published : Apr 17, 2021, 7:38 PM IST

नवी दिल्ली - देशातील कोरोना स्थिती अतिशय चिंताजनक असून वाढत्या रुग्णांबरोबर मृतांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत मंत्री विविध मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.

देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. सलग तिसर्‍या दिवशी दोन लाखाहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात कोरोना संक्रमण सुरू झाल्यापासून अलिकडे मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मृतांची दिवसेंदिवस विक्रमी वाढ होत असल्याने काळजी वाढली आहे. आजच्या बैठकीत देशातील कोरोनाची परिस्थिती आणि लसीकरणाबाबत मंत्री व अधिकाऱ्यांशी पंतप्रधान चर्चा करतील. यासह देशात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर औषधांच्या कमतरतेबाबतही चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - #modimadedisaster : कोरोना मृत्यूच्या आकेडवारीवरून राहुल गांधींची मोदींवर टीका

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार गेल्या 24 तासांत 234,692 नवीन कोरोना प्रकरणे समोर आली आहेत आणि 1341 संक्रमित लोकांनी प्राण गमावले आहेत. तथापि, कोरोनातून 1,23,354 लोक बरेही झाले आहेत. यापूर्वी गुरुवारी 217,353 नवीन प्रकरणे प्राप्त झाली होती. त्याच वेळी 15 सप्टेंबर रोजी सर्वाधिक 1290 मृत्यू झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details