हैदराबाद - काल पासून सोशल मिडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ ( PM Narendra Modi Teleprompter Video ) तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या चालू भाषणादरम्यान टेलिप्रॉम्पटरमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने भाषण थांबवाव लागलं. त्यांना पुढे काहीच बोलता आले नाही. त्यामुळे मोदी गोंधळात पडले. सोमवारी दाव्होस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ( World Economic Forum ) या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मोदी ( PM Narendra Modi Video Conference ) सहभागी झाले होते. त्यात हा गोंधळ उडाला. काँग्रेसने व्हिडिओ ट्विट करत मोदींची खिल्ली उडवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषणशैलीमुळे प्रसिद्ध आहे. सध्या कोरोनाची साथ असल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून अनेकदा त्यांनी देशाला संबोधित केले आहे. मोदींच्या भाषणामध्ये शब्दरचना, उच्चारण, प्रभावी हिंदी, आत्मविश्वास आणि हावभाव दिसून येते. अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमातही त्यांनी हजेरी लावली आहे. मात्र दाव्होस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात मोदींच्या भाषणादरम्यान उडालेल्या गोंधळानंतर सोशल मिडियावर त्यांची खिल्ली ( PM Narendra Modi Troll on Social Media ) उडवण्यात येत आहे. भाषणादरम्यान टेलिप्रॉम्टरमध्ये काहीतरी तांत्रिक अडचण आली आणि तो बंद झाला. यानंतर पंतप्रधान मोदी भाषण देता देता थांबले. पंतप्रधान मोदी गोंधळले आणि थोड्या संतापलेल्या हावभावासहीत स्क्रीनच्या उजवीकडे पाहू लागले. नंतर त्यांनी निराश होऊन हात वर करत हेडफोन लावला. आपल्या भाषणामध्ये झालेल्या गोंधळानंतर समोरच्यांना ऐकू येतंय का, हे विचारु लागले. ऐकू येत असल्याचाही प्रतिसाद आला. त्यानंतर काही सेकंद शांतता झाली. मात्र मोदी पुढे बोलू शकले नाही, असे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. या साऱ्या प्रकारामध्ये पंतप्रधान मोदी चांगलेच गोंधळलेले दिसले. टेलिप्रॉम्टर बंद झाल्यानंतर पंतप्रधानांना न अडखळता एक वाक्यही बोलता आलं नसल्याची टीका सोशल मीडियावरुन होत आहे. शिवाय ट्विटरवर #TeleprompterPM हा ट्रेण्ड देखील चालवण्यात आला.
'हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा...'-