नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. (Narendra Modi tribute to atal bihari vajpayee). यावेळी मोदी यांनी भारतासाठी वाजपेयींचे योगदान अतुल्य असल्याचे म्हटले. (atal bihari vajpayee birth anniversary). वाजपेयी यांनी 90 च्या दशकात भाजपचे नेतृत्व केले होते तसेच ते सहा वर्षे भारताचे पंतप्रधान राहिले आहेत.
Vajpayee Malviya Birth Anniversary : मोदींनी वाहिली वाजपेयी आणि मालवीय यांना जयंतीनिमित्त आदरांजली - नरेंद्र मोदी यांची आदरांजली
आज माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ मदन मोहन मालवीय यांची जयंती आहे. (atal bihari vajpayee birth anniversary). (madan mohan malviya birth anniversary). या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. (Narendra Modi tribute to atal bihari vajpayee). (Narendra Modi tribute to madan mohan malviya).
मोदींचे ट्विट :मोदींनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले, "अटलजींना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली. भारतासाठी त्यांचे योगदान अतुल्य आहे. त्यांचे नेतृत्व आणि दूरदृष्टी लाखो लोकांना प्रेरित करते." मोदी यांनी स्वातंत्र्यसैनिक आणि शिक्षणतज्ज्ञ मदन मोहन मालवीय (madan mohan malviya) यांना देखील त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. (Narendra Modi tribute to madan mohan malviya). ते म्हणाले, "बनारस हिंदू विद्यापीठाच्या स्थापनेमागील प्रमुख व्यक्तिमत्त्व असलेल्या मालवीय यांनी आपले जीवन शिक्षण क्षेत्राला सशक्त करण्यासाठी समर्पित केले. या कार्यासाठी ते नेहमीच स्मरणात राहतील. ते भारतमातेचे महान पुत्र होते." (madan mohan malviya birth anniversary).